शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मेडिक्‍लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST

नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजाने अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक ...

नागपूर : तीन तक्रारकर्त्या ग्राहकांना मेडिक्लेमचे पाच लाख रुपये सहा टक्के व्याजाने अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला दिला. व्याज २९ जानेवारी २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, तक्रारकर्त्या ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार अशी एकूण १५ हजार रुपये भरपाईही मंजूर करण्यात आली. ही रक्कमदेखील लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशननेच द्यायची आहे.

मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी संबंधित तक्रारीवर निर्णय दिला. या निर्णयाचे पालन करण्यासाठी कॉर्पोरेशनला एक महिन्याचा वेळ देण्यात आला. शालिनी मेडपिलवार, सारिका बंडावार व श्रीकांत मेडपिलवार अशी तक्रारकर्त्यांची नावे असून ते मयत उल्हास मेडपिलवार यांचे वारसदार आहेत. उल्हास मेडपिलवार यांनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून १९ डिसेंबर २०११ ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी पाच लाख रुपयाची मेडिक्लेम पॉलिसी काढली होती. त्‍यानंतर त्यांचा लिव्हरच्या आजारामुळे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. करिता, वारसदारांनी कॉर्पोरेशनकडे मेडिक्‍लेम सादर केला. परंतु, कॉर्पोरेशनने त्यांना मेडिक्लेमची रक्कम अदा केली नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती.