शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवा कोलमडली

By admin | Updated: March 22, 2017 02:49 IST

मेडिकल प्रशासनाला निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न दुसऱ्या दिवशी सोडविता आला नाही,

नागपूर : मेडिकल प्रशासनाला निवासी डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न दुसऱ्या दिवशी सोडविता आला नाही, तर निवासी डॉक्टर तो सोडवून घेण्याच्या तयारीतही नसल्याने मेयो आणि मेडिकलमधील रुग्णसेवा कोलमडली आहे. जिथे एका पाळीत सहा निवासी डॉक्टर विभाग सांभाळत होते तिथे एक किंवा दोन इंटर्न व परिचारिका मिळून वॉर्ड सांभाळत आहे. यामुळे उपचार नावापुरताच होत असून अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलेल्या जात आहे. दोन्ही रुग्णालयातील अत्यावश्यक रुग्ण सेवाही प्रभावित झाली आहे. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या मागणीवरून सुट्यांवर गेलेल्या निवासी डॉक्टरांना मेडिकल प्रशासनाने मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. धुळे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद व पुणे येथील रुग्णालयात झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध व सुरक्षेचा मुद्दा रेटून धरत मेयो व मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी सोमवार सकाळी ८ वाजेपासून वैयक्तिक स्वरूपात कामबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचा मंगळवार हा दुसरा दिवस आहे. निवासी डॉक्टर हे मेडिकल व मेयोचा कणा आहे. परंतु या आंदोलनात मेडिकलचे ३०० तर मेयोचे १४० डॉक्टर सहभागी झाल्याने अर्धवट उपचार करुन रुग्णांना वॉर्डातून सुटी दिली जात आहे. दोन्ही रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया अर्ध्यावर आल्या आहेत. केवळ तातडीच्या स्वरुपाच्या शस्त्रक्रिया केल्या जात असून नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांना बसत आहे. अर्धवट उपचार करून पुन्हा दोन-तीन दिवसानंतर येण्यास सांगितले जात आहे. तर काही रुग्ण वेदना सहन करीत मेडिकल आणि मेयोच्या परिसरात आंदोलन संपण्याच्या प्रतीक्षेत आहेत. (प्रतिनिधी) सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे सुरक्षेच्या मुद्याला घेऊन गैरहजर राहणाऱ्या निवासी डॉक्टरांना मंगळवारी सायंकाळी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पाच बंदुकधारी पोलिसांच्या जागी आता सात पोलीस करण्यात आले आहे. शिवाय चौविस तासत्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. - डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल