शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

रुग्ण उष्माघाताचे, लेबल तापाचे!

By admin | Updated: May 3, 2015 02:02 IST

उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि ...

नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे आदी प्रकार टाळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो ) आणि खासगी इस्पितळांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांवर तापाचे रुग्ण म्हणून उपचार करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे.विशेष म्हणजे, २०११ मध्ये मेडिकलच्या शीतकक्षात उष्माघाताचे १७ रुग्ण भरती होते. एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या या रुग्णांची तपशीलवार माहिती आरोग्य संचालक कार्यालयातून मागविण्यात आली होती, परंतु माहिती देण्यास मेडिकल अपयशी ठरले होते. तेव्हापासून कागदपत्रांचा त्रास वाचविण्यासाठी मेडिकलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची तापाचे रुग्ण म्हणून नोंद केली जाते. यामुळे मेडिकलमध्ये गेल्या चार वर्षात उष्माघाताच्या रुग्णाची नोंदच नाही. असेच मेयोसह खासगी इस्पितळांमध्येही आहे.एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पारा ४५ अंशावर गेला आहे. मेडिकल आणि मेयोचे शीतकक्ष तयार आहेत. दिवसाकाठी चार ते पाच उष्माघाताचे रुग्णही उपचारासाठी येत आहेत. परंतु डॉक्टर त्यांच्या केसपेपरवर उष्माघाताची नोंद न करता सर्वसाधारण तापाची नोंद घेत आहे. यामुळे शीतकक्ष वॉर्डात रुग्ण आहेत परंतु ते उष्माघाताचे नाही, असा दावा केला जात आहे. या मागील कारण जाणून घेतले असता, सूत्राने सांगितले, उष्माघात व तापाच्या रुग्णावरील उपचार सारखाच असतो. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवणे, त्यांच्यावरील उपचार पद्धतीची बारीकसारीक माहिती ठेवणे, ही माहिती शल्यचिकित्सकांपासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्णाचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार करावे लागतात. हे टाळण्यासाठी औषधे वैद्यक शास्त्राचे डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात. (प्रतिनिधी)