शहरं
Join us  
Trending Stories
1
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
2
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
3
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
4
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
5
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
6
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
7
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
8
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
9
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...
11
"मोदी आणि मी कायम मित्र राहू..."; अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत   
13
राष्ट्रसंत मोरारी बापू यांना राज्य सरकारकडून अतिथी दर्जा!
14
OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
15
१ लाख रुपयांचे झाले १ कोटी, या स्टॉकनं केलं मालामाल; मोटरसायकल आणि थ्री व्हिलर बनवते कंपनी, तुमच्याकडे आहे का?
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा रद्द, आता एस. जयशंकर करणार UNGA मध्ये भारताचं प्रतिनिधित्व
17
"घाबरू नका, प्रत्येक समस्येचे निराकरण होईल"; CM योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना दिला धीर
18
केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही
19
"पाठीत खंजीर खुपसणारे..."; विराट कोहली-युवराज मैत्रीबाबत युवीच्या वडिलांचे धक्कादायक विधान
20
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा

पालकांनो आधी संस्कारित व्हा !

By admin | Updated: November 17, 2014 00:59 IST

काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील,

संजय रघटाटे : ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ उपक्रमनागपूर : काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, तर मुले कशी संस्कारित होणार. त्यामुळे आधी पालकांनी संस्कारित व्हावे तेव्हाच मुले सहज संस्कारित होतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, आॅक्सफर्ड अ‍ॅकेडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे यांनी व्यक्त केले. बालकदिनानिमित्त लोकमत सखी मंच व लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सृजन संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. रघटाटे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शनाबरोबरच, पालकांना पोटभरून हसविले. ते म्हणाले की, आपण जे करतो, तेच मुले करतात. त्यासाठी पालकांनीच स्वत: चेहऱ्यावर हास्य ठेवावे, दुसऱ्याचा आदर करा, चांगले श्रोते बना, कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगा. दृष्टी बदला, सृष्टी नक्कीच बदलेल. आजच्या काळातील मुलांच्या मानसिकतेसंदर्भात बोलताना डॉ. अनुपमा गडकरी म्हणाल्या की, आज पालकांना मुलांच्या बाबतीत चार चॅलेंजेस भेडसावतात. काळानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.मुलांना रागही लवकर येतो. टेक्नॉलॉजीचा परिणाम मोठा आहे. मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. सामाजिक बदलाच्या स्थित्यंतरामध्ये पालक व बालक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत. बालकांकडे आज बऱ्यापैकी माहिती आहे. यात काही वाईट आणि चांगलीही माहिती आहे. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा, सामाजिक बदल झाला असला तरी, आईवडिलांप्रती त्यांना आजही जिव्हाळा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मुलांपुढेही अनेक चॅलेंजेस उभे ठाकले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. मुलांना राग लवकर येतो, ते लवकर निराश होतात, त्यामुळे आजचे पालक काळजीत आहेत. जन्मत: प्रत्येक मुलाला १४ भावना असतात. वयानुसार त्याची जाणीव होते. पूर्वी १६ वर्षापर्यंत भावनांची मुलांना जाणीव व्हायची आता ६ व्या वर्षीच भावना जागृत होतात. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीमुळे मुलांना नव्यानव्या गोष्टी दिसत आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी मुलांना काय शिकवित आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी पालकांनी बालकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाय सांगितले कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)