शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

करंट लागल्यामुळे पेंटरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

नागपूर : घराच्या भिंतीला रंग देत असताना करंट लागल्यामुळे रतिराम ऊर्फ छोटू रामचंद्र बोपचे ( वय ५४, रा. दाभा) ...

नागपूर : घराच्या भिंतीला रंग देत असताना करंट लागल्यामुळे रतिराम ऊर्फ छोटू रामचंद्र बोपचे ( वय ५४, रा. दाभा) यांचा करून अंत झाला. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कीर्तीधर हाैसिंग सोसायटीमध्ये वर्गीस यांच्या घरी मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता ही घटना घडली. विनेश जयदेव कंगलवार यांनी दिलेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

चाकूहल्ला करून रक्कम लुटली

नागपूर : दोन गुंडांनी एका तरुणावर चाकूहल्ला करून त्याच्या जवळचे साडेनऊ हजार रुपये लुटून नेले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद इरफान मोहम्मद रफी शेख हा त्याच्या मित्रासोबत दिवसभर केलेल्या कामाच्या पैशाचा हिशोब कळमन्यात बसून करत असताना आरोपी बंटी ऊर्फ सय्यद शहजाद अली तसेच सोबू ऊर्फ सोहेल शेख खलील शेख हे दोघे तेथे आले. त्यांनी इरफानला शिवीगाळ करून दोनवेळा त्याच्यावर चाकू फिरवला. त्यानंतर कमरेवर वार करून त्याला खाली पाडले. तोंडावरही चाकू मारून त्याच्या खिशातील ९५०० रुपये हिसकावून आरोपी पळून गेले. जखमी इरफानने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

महिलेने लावला गळफास

नागपूर : येथील मोठा ताजबाग परिसरात हिंदीबनमध्ये राहणाऱ्या नसरीन मोहम्मद इरफान (३२) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद इरफान अब्दुल जब्बर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----