शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

स्वरातून मांडल्या शेतकºयांच्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:34 IST

शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे.

ठळक मुद्दे‘जाने नही देंगे तुझे’: हतबल बळीराजाच्या मदतीसाठी जनमंचचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अस्मानी व सुल्तानी संकटाशी रोज दोन हात करणारा हा लढवय्या शेतकरी अखेर निराश मनाने स्वत:ला संपवत सुटला आहे. त्याच्या मागे त्याच्या कुटुंबाची पार वाताहत होत आहे. अशा निराश शेतकºयांच्या मनात आशावाद पेरण्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी जनमंच या सामाजिक संस्थेतर्फे रविवारी संध्याकाळी शंकरनगरातील साई सभागृहात ‘जाने नही देंगे तुझे’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सागर मधुमटके, श्रुती चौधरी, अरविंद पाटील, मनोहर रडके, रेणुका इंदूरकर या गायकांनी आपल्या गोड आवाजात मधूर गाणी सादर केली. राजेश किलोर यांची संकल्पना असलेल्या व ‘फायर’ या शीर्षकांतर्गत आपला पहिलाच कार्यक्रम घेऊन रसिकांपुढे येणाºया या ग्रुपने अतिशय सुंदर सुरुवात केली. राजेश किलोर यांच्या ‘तू हैं आसमा, ये तेरी जमी हैं...’ या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मनोहर रडके यांच्या ‘तुझ से नाराज नाही जिंदगी...’ या गीतानेही रिझवले. श्रुती चौधरी या गुणी गायिकेने अतिशय तयारीने गायलेले ‘सून रहा हैं ना तू...’ हे गीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेले. यानंतर मंचावर आला सागर मधुमटके. ‘रूक जाना नही तू कही हार के...’ हे त्याचे गीत शेतकºयालाच समर्पित होते. त्याने गायलेले ‘दिये जलते हैं...’ हे गाणेही कर्णप्रिय ठरले.अरविंद पाटील यांनी ‘मै पल दो पल का शायर हूं...’ आपल्या खास शैलीत गायले. डॉ. रेणुका इंदूरकर हिची ‘आज जाने की जिद ना करो...’ ही गझल श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्वेता शेलगांवकर यांनी केले. या गोड गळ्याच्या गायकांना की-बोर्डवर रॉबिन विलियम, प्रशांत मिसर, गिटार-प्रकाश चव्हाण, बेस गिटार-रिंकू निखार, वसंत भट, आॅक्टोपॅड-अक्षय हर्ले, तबला-श्रीकांत सूर्यवंशी व ढोलकवर अनिकेत याने सुरेल सहसंगत केली.७ जानेवारीला शेतकरी मेळयाव्यात वाटणार निधीया कार्यक्रमाद्वारे गोळा होणारा निधी शेतकºयांच्या मदतीसाठी दिला जाईल, अशी घोषणा जनमंचने केली होती. त्यानुसार ७ जानेवारी २०१८ रोजी प्रस्तावित शेतकरी मेळाव्यात या निधीचे वाटप केले जाईल, असे या कार्यक्रमात जाहीर करण्यात आले.