शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

ऑक्सिजनमुळे रखडले समृद्धी महामार्गाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

कमल शर्मा नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. ...

कमल शर्मा

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची नवीन डेडलाईन ठरविण्यासाठी विभाग विचारविमर्श करीत आहे. या महामार्गाचे काम मे महिन्यात पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला होता. कोरोनाच्या संक्रमणामुळे वेळेत काम पूर्ण होणे शक्य झाले नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वेल्डिंगचे काम थांबले होते. त्यामुळे आता सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या प्रकल्पाचा आढावा घेतला. नागपूर ते मुंबईपर्यंत हा महामार्ग बनत आहे. या प्रकल्पाचे नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या टप्प्याचे काम थांबले आहे. बैठकीत या प्रकल्पावर काम करीत असलेले महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन (एमएसआरडीसी)चे अधिकारी हे काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन ठरवू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या समीक्षा बैठकीचा हवाला देताना अधिकाऱ्यांनी याबाबत चुप्पी साधली; पण उच्चस्तरीय सूत्रांचा दावा आहे की, ऑक्टोबरमध्ये समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे; पण हे सर्व कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीवर निर्भर आहे.

कोरोनामुळे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. विशेष म्हणजे वेल्डिंगचे काम थांबलेले आहे. कोरोना संक्रमणामुळे ऑक्सिजन केवळ रुग्णालयांसाठीच आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता. फेब्रिकेशन, वेल्डिंगच्या कामासाठी ऑक्सिजनचा उपयोग होतो. मार्च ते मे महिन्यांदरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकला नाही. आता सर्व काही ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर निर्भर आहे.

मे २०२१ ला सुरू होणार होता महामार्ग

समृद्धी महामार्गावर वाहतूक कधी सुरू होईल, याची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज्य सरकारने दावा केला होता की, या प्रकल्पाचा पहिला टप्पा (नागपूर ते शिर्डी) १ मे २०२१ ला सुरू होईल; परंतु कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते इगतपुरी दरम्यान १०३ किलोमीटरचा मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. इगतपुरी ते वडपे दरम्यानचा रस्ता १ मार्च २०२२ पर्यंत सुरू होण्याचा दावा केला जातोय. आता एमएसआरडीसीचे म्हणणे आहे की सर्वच डेडलाईन बदलाव्या लागणार आहेत.