शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणाच्या माध्यमातून अतिक्रमणावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:10 IST

- एनएचएआयची एनएच-६९वर मोहीम : अतिक्रमण तोडताच करण्यात येताहेत वृक्षारोपण वसीम कुरैशी नागपूर : महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविल्यानंतर ...

- एनएचएआयची एनएच-६९वर मोहीम : अतिक्रमण तोडताच करण्यात येताहेत वृक्षारोपण

वसीम कुरैशी

नागपूर : महामार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण हटविल्यानंतर दुसऱ्यांदा अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६९च्या काही भागात करण्यात आलेले वृक्षारोपण अतिक्रमण नियंत्रणाचे माध्यम बनले आहे. अतिक्रमण थोपविण्यासाठी निर्धारित सीमेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे.

वृक्ष पर्यावरणाची स्वच्छता, हिरवळ आणि ऑक्सिजन देण्यासह महामार्गाच्या सौंदयीकरणात महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण राष्ट्रीय महामार्ग-६९ अतिक्रमण नियंत्रण आणण्यासाठी मदतनिस ठरत आहे. आता रस्त्याच्या कडेला कोणतेही अतिक्रमण तोडल्यानंतर वृक्षारोपण करण्यात येत आहे. याशिवाय महामार्गालगतच्या ले-आउटमालकांनी अवैधरीत्या ले-आउट ते महामार्गापर्यंत जोडलेल्या अ‍ॅप्रोच रोडच्या मध्यभागी खड्डे खोदून वृक्ष लावण्यात येत आहेत. त्यामुळे अतिक्रमणावर नियंत्रण आले आहे.

एकल रस्त्याला बनवित आहे दुहेरी

राष्ट्रीय महामार्ग-६९वर कोराडी मंदिरासमोरील उड्डाणपुलाच्या कामाची गती संथ आहे. त्यामुळे महादुलाच्या दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचा उपयोग अ‍ॅप अ‍ॅण्ड डाऊन वाहतुकीसाठी करण्यात येत आहे. पण स्थानिक लोक एकल सर्व्हिस रोडचा उपयोग दुहेरी रोडसारखा करीत आहेत. या भागातून ट्रक, बस आणि अवजड वाहने धावतात. तसेच विरुद्ध दिशेने कार आणि दुचाकी वाहनेसुद्धा येतात. उड्डाणपुलाचे डिझाइन निश्चित झाल्यानंतर प्रारंभीपासूनच बांधकाम उशिराने सुरू आहे. उड्डाणपुलात कोराडी मंदिरजवळील भागात होणाऱ्या मोठ्या अंडरपास रस्त्यावरून अवजड वाहनेसुद्धा जातील. या अंडरपासच्या दोन्ही बाजूला आणखी दोन अंडरपास राहणार आहे. त्यातून कार व दुचाकी जातील. या पुलाचे बांधकाम जवळपास ६ ते ८ महिने उशिराने सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग असल्याने महादुला येथे वाहतुकीला अडचणी येत आहे. या उड्डाणपुलाचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे.

झाडांचे प्रत्यारोपण यशस्वी नाही

नागपूरच्या जलवायूच्या हिशेबाने येथे मोठ्या झाडांचे प्रत्यारोपण यशस्वीरीत्या होत नाही. मनपाच्या नियमानुसार झाडाचा बुंदा ३० सेमी जाड असेल आणि त्याची मुळे जमिनीत जिवंत राहत असेल तर असे वृक्ष कापणे गैरकायदेशीर असते.

कौस्तुभ चटर्जी, पर्यावरणतज्ज्ञ.