शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाहून अधिक भूखंड नियमित

By admin | Updated: March 16, 2017 02:21 IST

नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) नियमितीकरणासाठी १ लाख ५८ हजार ९३४ भूखंडधारकांनी अर्ज केले होते.

नासुप्रची मोहीम यशस्वी : भूखंडधारकांना दिलासा नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासकडे (नासुप्र) नियमितीकरणासाठी १ लाख ५८ हजार ९३४ भूखंडधारकांनी अर्ज केले होते. यातील १ लाख २३ हजार ३७२ लोकांना मागणीपत्र पाठविण्यात आले होते. ज्यांनी विक्रीपत्र सादर केले. भूखंड वादग्रस्त नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे, असे १ लाख ३ हजार ५७५ भूखंड नियमित करण्यात आले आहे. गुंठेवारी अधिनियम २००७ अनधिकृत अभिन्यासांतर्गत येत असलेल्या १९०० व ५७२ ले-आऊ टमधील भूखंडांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. नासुप्रने भूखंड नियमितीकरणाची मोहीम राबविल्याने नियमितीकरणाला गती मिळाली. यामुळे शहरातील लाखो भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नासुप्र संदर्भात सर्वसामान्यात वर्षभरापूर्वी चांगली प्रतिक्रिया नव्हती. कामासाठी चकरा माराव्या लागतात, अशा लोकांच्या तक्रारी असायच्या. परंतु अभिन्यास नियमितीकरणाला लागणारा विलंब विचारात घेता, सभापती दीपक म्हैसेकर यांनी जाचक नियमात शिथिलता आणली. फाईल्सचा तातडीने निपटारा होण्यासाठी प्रशासकीय सुधारणा केल्या. प्रकल्प विभागाची व सामान्य प्रशासन विभागाची स्थापना, नाहरकत प्रमाणपत्राची अट रद्द, नासुप्रद्वारे वेगळी नामांतर प्रकिया बंद व शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने कामकाजात गती आली. त्यामुळेच लाखाहून अधिक भूखंड नियमित करण्याला यश मिळाले. नागपूर शहरात भूखंड नियमितीकरणाची प्रक्रिया महापालिका व नासुप्र यांच्या स्तरावर राबविली जाते. परंतु भूखंडाच्या नियमितीकरणासाठी महापालिका व नासुप्र यांच्या शुल्क आकारणीत मोठी तफावत होती. नासुप्रकडून अधिक शुल्क आकारले जात होते. जाचक शुल्क आकारणीमुळे नियमितीकरणाला भूखंडधारकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे नियमितीकरणासाठी सरसकट ५६ रुपये प्रतिचौरस फूट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे नियमितीकरणाला गती मिळाली. (प्रतिनिधी)