शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

२ लाखांवर ग्राहकांनी स्वत: पाठवले वीजमीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाइल अ‍ॅप, वेबसाईट व एसएमएसद्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये नागपूर परिमंडळातून ७२६९, अकोला - ७१८० तर पुणे परिमंडळातील सर्वाधिक ४९,९५० त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील २८,९१६ वीजग्राहकांचा समावेश आहे.

वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रीडिंग पाठविण्याची मुदतदेखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाइल एसएमएसद्वारेदेखील मीटर रीडिंग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख ३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रीडिंग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवस आधी रीडिंग पाठविण्याची एसएमएसद्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून रीडिंग पाठविता येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडलमधील ४९९५०, कल्याण - २८९१६, नाशिक - २२३३०, भांडुप - १८०९३, बारामती - १३७३३, जळगाव - १०८७७, औरंगाबाद - १०१००, कोल्हापूर - ८४७०, नागपूर - ७२६९, अकोला - ७१८०, लातूर - ६०८५, अमरावती - ५६६२, कोकण - ४२२३, गोंदिया - ३४६४, नांदेड - ३२६२ व चंद्रपूर परिमंडळातील ३,१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.