शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

नदीकाठी नियमबाह्य खोदकाम

By admin | Updated: May 30, 2014 01:11 IST

तालुक्यातील तामसवाडी, वाघोडा यासह अन्य शिवारात मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत. यातील बहुतांश विटभट्टय़ा या कन्हान नदीच्या काठी आहेत. या विटभट्टय़ा मालकांनी कन्हान नदीच्या काठी

महसूल विभागाची मूकसंमती : तामसवाडी, वाघोडा शिवारातील विटभट्टय़ा मालकांचे कृत्यविजय भुते - पारशिवनीतालुक्यातील तामसवाडी, वाघोडा यासह अन्य शिवारात मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत.  यातील बहुतांश विटभट्टय़ा या कन्हान नदीच्या काठी आहेत. या  विटभट्टय़ा मालकांनी कन्हान  नदीच्या काठी नियमबाह्यरीत्या अवैध खोदकाम करून येथील माती विटा तयार करण्यासाठी  वापरायला सुरुवात केली आहे. या गंभीर प्रकाराला महसूल विभागाची मूकसंमती असल्याचे दिसून  येते. परिणामी, नदीचे अस्तित्व धोक्यात येऊन नदीकाठी वसलेल्या गावांना पुराचा धोका निर्माण  झाला आहे.तालुक्यात इटगाव, पारडी, तामसवाडी, डोरली, वाघोडा, सिंगोरी, नेरी, पालोरा, माहुली या शिवारात  मोठय़ा प्रमाणात विटभट्टय़ा आहेत. यातील तामसवाडी व वाघोडा शिवारातील विटभट्टय़ा या  कन्हान नदीच्या तिरावर आहेत. या सर्व विटभट्टय़ांमध्ये विटा तयार करण्यासाठी माती वापरली  जाते. नदी परिसरात खोदकाम करताना १00 फुटांपलिकडे मातीचे पाच फुटांपेक्षा अधिक खोलवर  खोदकाम करू नये, असा नियम आहे. मात्र, विटभट्टय़ा मालक या परिसरात जेसीबी मशीनद्वारे  मातीचे खोदकाम करीत आहेत. त्यामुळे येथे अंदाजे ३५ ते ३५ फूट खोल मोठमोठे खड्डे पडले  आहेत. विटभट्टय़ांसाठी लागणार्‍या मातीची महसूल विभागाकडून रीतसर परवानगी दिली जाते. यासाठी एक  ते दीड हजार रुपये प्रति ब्रास माती याप्रमाणे शुल्क आकारून तो वसूल केला जातो. त्यानंतर  नियमानुसार खोदकामास परवानगी दिली जाते. यातील काहींनी या परिसरात स्वत:च्या जागेवर  विटभट्टय़ा सुरू करून विनापरवानगी मोठय़ा प्रमाणात मातीचे खोदकाम केले आहे. ओव्हरलोड  वाहतुकीमुळे पारडी-खंडाळा-तामसवाडी या मार्गाची अल्पावधीतच दैनावस्था झाली आहे.  परिसरातील पिपळा-गवणा-गरंडा-वाघोडा-डोरली या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत.  वाघोडा शिवारात या विटभट्टी मालकाने नदीकाठी असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर विटांचा ढीग  लावला असून, जेसीबीने खोदकाम करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार मागील काही वर्षांंपासून  सुरू असल्याचे जाणकारांनी सांगितले. यातील काही विटभट्टी मालकांकडे स्थानिक ग्रामपंचायतचे  नाहरकत प्रमाणपत्र नाही. तामसवाडी व इटगाव शिवारात कन्हान नदीकाठी ३00 एकर क्षेत्रात  झुडपी जंगल आहे. यात मोठय़ा प्रमाणात सीताफळाची झाडे होती. विटभट्टी मालकांनी केलेल्या  अवैध खोदकामात ही झाडे नष्ट झाली आहेत.  या अवैध वृक्षतोडीमुळे एकीकडे पर्यावरणाचे  संतुलन ढळत चालले आहे तर, दुसरीकडे नदीच्या काठी खोदकाम केल्याने नदीच्या पात्राला आणि  नदीकाठी वसलेल्या गावांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाने लक्ष  देणे गरजेचे आहे.