शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आफ्रिकन तूर घोटाळ्यातील म्होरके बाहेरच

By admin | Updated: October 27, 2015 03:51 IST

कोट्यवधीच्या आफ्रिकन तूर घोटाळ्यातील चार आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी प्रथम श्रेणी

नागपूर : कोट्यवधीच्या आफ्रिकन तूर घोटाळ्यातील चार आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एन.एन. बेदरकर यांच्या न्यायालयाने नामंजूर केली. त्यांना न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी केली. पोलिसांनी अद्यापही या घोटाळ्यातील म्होरक्यांना हात लावलेला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. आलम, सलाम आणि मुन्ना, अशी या म्होरक्यांची नावे आहेत. कारागृहाकडे रवाना करण्यात आलेल्यांमध्ये राजवीरसिंग, रियाज अली, विनायक हाडके आणि मड्डीसिंग यांचा समावेश आहे. या आरोपींना २० आॅक्टोबर रोजी अटक करून त्यांच्याकडून ३२ टन आफ्रिकन तूर, ३ ट्रक, असा एकूण २७ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील बरेच डाळ व्यापारी बऱ्याच वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेतून आयात केलेल्या तुरीचा व्यापार करतात. ही तूर मुंबईहून ट्रकने नागपुरात संबंधित व्यापाऱ्यांकडे येत होती. ही तूर व्यापाऱ्यांपर्यंत पोहचेपर्यंत वाटेतच मोठ्या प्रमाणावर तुरीची अफरातफर केली जात होती. विशिष्ट टोळ्यांचे नेटवर्क या घोटाळ्यात सक्रिय झाले होते. ठिकठिकाणच्या धाब्यांपासून तर छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत ही तूर पोहोचती होत होती. धरमकाट्यावरील तुरीच्या वजनाची तफावत दूर करण्यासाठी ट्रकमध्ये रेतीने भरलेली पोती लोड केली जात होती. अफरातफरीतील तूर अचानक आफ्रिकन तुरीचा व्यापार करणाऱ्या बड्या व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी आली आणि बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या या गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला. अनिमेष अशोक अग्रवाल (गोयल) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली. ३५ टनाच्या तुरीचा घोटाळा झाल्याचे गोयल यांनी आपल्या तक्रारीत उल्लेख केला होता. या धंद्यातील आणखी बरेच मोठे मासे अद्यापही पोलिसांच्या गळाला लागलेले नाहीत. सोमवारी एएसआय राजेश ठाकूर यांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली असता न्यायालयाने ती नामंजूर केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. विलास डोंगरे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)