शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच! मिरची कटाई करणाऱ्या महिलांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 12:02 IST

जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा गौरव होत असला तरी ‘आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच’ असल्याची व्यथा मिरची कटाई केंद्रावरील महिलांनी मांडली.

ठळक मुद्देरोजगार मिळाला मात्र वेदनांचे काय?कटाई केंद्रावरच झोपतात चिमुकले शालेय विद्यार्थिनी, नवविवाहित महिला, गर्भवती महिला आणि म्हाताऱ्या आजीबाईदेखील या कटाई केंद्रावर काम करतात. अनेक महिला मजूर आपल्या चार-पाच महिन्याच्या बाळाला घेऊन कामाला येतात. केंद्राच्या झोपडीला पाळणा बांधून तेथेच चिमुकल्या

शरद मिरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सकाळी उठल्यापासून मिरची कटाईची लगबग सुरू होते. उन्हाचा पारा अन् घामाच्या धारा त्यातही मिरचीच्या सहवासात राहिल्याने अंगाची लाहीलाही. हिवाळा असो वा पावसाळा हा नित्यक्रम ठरलेलाच. डोळ्यांची आग, पाठीला वाक आणि बसण्याचा त्रास सोसत या महिलांना रोजगार मिळाला खरा, परंतु त्यांच्या वेदनांचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सततच्या मिरचीच्या सहवासामुळे कटाई मजुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा गौरव होत असला तरी ‘आमच्या नशिबी फक्त उपेक्षाच’ असल्याची व्यथा मिरची कटाई केंद्रावरील महिलांनी मांडली.गेल्या ४० वर्षांपासून भिवापुरातील मिरची कटाई केंद्र रोजगाराचे केंद्र ठरले आहे. मिरचीच्या सातऱ्यावर कटाईचे काम वर्षभर सुरू असते. येथे मजुरांना वयाचे बंधन नाही. त्यामुळे लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच मिरची कटाईच्या कामाला जुंपतात. यात महिला, मुली व म्हाताऱ्या आजीबाईची संख्या लक्षणीय आहे.रोजगार मिळाला, त्यासोबत वेदनादेखील. सतत मिरचीच्या ढिगावर काम करताना मजुरांना प्रचंड वेदना होतात. संपूर्ण शरीराची, डोळ्याची आग पेटते. तिखटाची खेस यामुळे खोकला व सर्दीने हे मजूर भांबावले असतात. सलग १२ तास एकाच जागेवर बसून काम करताना मजुरांना पाठीचा त्रास, सांधेदुखीचे प्रमाण वाढले आहे. मात्र रोजगाराचे दुसरे साधन नसल्याने शेकडो हात आपल्या कुटुंबाचा गाढा पुढे रेटावा म्हणून राबत आहेत. मुलांचे शिक्षण, लग्न, आरोग्याच्या समस्या या सर्वांचा निपटारा करीत हे मजूर मिरची कटाईवर मिळणाऱ्या अल्पमजुरीत आपला उदरनिर्वाह करीत आहेत.

आरोग्य समस्या वाढल्यासकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मजूर मिरचीच्या मुख्या काढतात. काही महिला मजूर ओली मिरची हाताने पसरविण्याच्या कामी असतात. सतत मिरचीच्या सहवासामुळे मजुरांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहे. शरीराला खाज सुटणे, आग होणे, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, अंधुकपणा, सर्दी, खोकला, पाठीचा कणा, सांधेदुखी, शरीरावर चट्टे पडणे तसेच महिलांमध्ये हिमोग्लोबीन कमी होऊन अ‍ॅनेमियासारख्या आजार वाढत असल्याचे वैद्यकीय अभ्यासात उघड झाले आहे.

‘ते’ फिरकतही नाहीत...मिरची कटाई केंद्रावरील महिलांना भेडसावणाऱ्यां आरोग्य समस्या नवीन नाहीत. सत्ता बदलली, नेतेही बदलले मात्र समस्या सुटल्या नाही. तालुक्यात सद्यस्थितीत ६ ते ७ मिरची कटाई केंद्र आहे. एका केंद्रावर किमान ४०० च्या जवळपास मजूर असतात. निवडणुका आल्या की, प्रत्येक उमेदवार या केंद्रांना हमखास भेटी देतो. महिला मजुरांच्या आरोग्यविषयक समस्येची आस्थेने विचारपूस करतात. अनेक प्रलोभने देतात. त्यानंतर मात्र ‘ते’ इकडे फिरकतदेखील नाही, अशी व्यथा महिलांनी मांडली. किमान महिलादिनी या मिरची कटाई केंद्रावर एखादा लोकप्रतिनिधी येईल आणि उपेक्षेच जीणं जगणाऱ्यां या महिला मजुरांच्या कार्याचा गौरव करेल, ही आशाही फोल ठरत आहे.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस