शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमची ठणकली त्या दिवशी तुमची झोप उडवू -पटेल

By admin | Updated: June 1, 2017 18:23 IST

‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासकीय रूग्णालयात गरिबांना उपचार होऊन आपला जीव वाचणार असे वाटते. मात्र येथील रूग्णालयांत लोकांचे जीव जात आहे. बाई गंगाबाई रूग्णालयात ३४ मुलांचा जीव गेला ही साधारण बाब नाही. मात्र एवढ्या गंभीर विषयावर एकही जनप्रतिनिधी बोलायला तयार नाही ही खेदाची बाब आहे. मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. सर्व म्हणतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. मात्र आम्ही म्हणत होतो काही काळ धीर धरा. आता मात्र तीन वर्षे लोटली असून सरकार काहीच करीत नसल्याचे दिसत आहे. मात्र त्यांनी लक्षात घ्यावे ‘ज्या दिवशी आमची ठणकली, त्या दिवशी आम्ही सर्वांची झोप उडवू’, असा इशारा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने शहरात शेतकरी कर्जमाफी यासह नागरिकांच्या विविध विषयांना घेऊन गुरूवारी (दि.१) आयोजीत धरणे आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात मंचावर फक्त खासदार प्रफुल्ल पटेल विराजित होते माजी आमदार राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, शहर अध्यक्ष अशोक सहारे व अन्य उपस्थित होते. उप विभागीय अधिकारी कार्यालया समोर आयोजीत या आंदोलनात पुढे बोलताना खासदार पटेल यांनी, दोन वर्षांपूर्वी नितीन गडकरी यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी आठ हजार कोटींच्या रस्त्यांचे भूमीपूजन केले होते. त्यातील किती रस्त्यांचे काम झाले याबाबत अभियंत्यांशी विचारणा केली असता त्यांनी निधी तर सोडाच मात्र यातील रस्ते कोणते याचीही माहिती नसल्याचे सांगीतले. यातून हे सरकार किती विकासकामे करीत आहेत याची प्रचिती येत असल्याचा टोला लगावला. सन २०१० मध्ये आसाममधील पुलाचे भूमीपूजन झाले होते. त्याचे काम सुरू होते. आता मात्र सत्ताधारी हे आपलेच काम असल्याचे दाखवित आहेत. या देशात आज जे काही होत आहे. ते यांच्यामुळेच होत असल्याचा माहौल निर्माण केला जात असल्याचे पटेल म्हणाले. दरम्यान उपस्थित अन्य मान्यवरांच्या भाषणांनंतर बैलगाडीने खासदार पटेल जयस्तंभ चौकात पोहचले व त्यांनी चौकात रस्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जागेवर येऊन स्वीकारावे व तेथूनच वरिष्ठांशी बोलणी करावी अशा सूचना यंत्रणेला पूर्वीच देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हाधिकारी आले नाही व त्यांचे प्रतिनिधी म्हणून उप जिल्हाधिकारी मंगेश मोहिते आले. यावर मात्र रस्ता रोको आंदोलन मागे न घेतले असता खासदार पटेल यांच्यासह आंदोलनकाऱ्यांना अटक करण्यात आली.