शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

-तर मनपा आयुक्तांनी हजर रहावे

By admin | Updated: March 24, 2016 02:41 IST

‘लोकमत’ने शहरात किती अनधिकृत बाजार आहेत, बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव, अत्याधुनिक बाजार

नागपूर : ‘लोकमत’ने शहरात किती अनधिकृत बाजार आहेत, बाजारात मूलभूत सुविधांचा अभाव, अत्याधुनिक बाजार उभारण्याची गरज इत्यादीसंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. यावर दोन आठवड्यात उत्तर सादर केले नाही, तर महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने बाजारांच्या दयनीय अवस्थेची दखल घेऊन स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे न्यायालय मित्र आहेत. त्यांनी ‘लोकमत’मधील वृत्त न्यायालयासमक्ष सादर केले होते. न्यायालयाने पुरेसा वेळ देऊनही मनपाने यावर उत्तर सादर केले नाही. यामुळे वरीलप्रमाणे निर्देश देण्यात आले. शहरातील कॉटन मार्केट, सक्करदरा बाजार, मंगळवारी बाजार, नेताजी मार्केट, गोकुलपेठ बाजार यासह विविध बाजारांची अत्यंत वाईट अवस्था आहे. बाजारांत सर्वत्र घाण पसरली आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे. महानगरपालिकेतर्फे बाजारांची नियमित सफाई केली जात नाही. मोकाट कुत्री व अन्य जनावरे बाजारभर फिरत असतात. बाजारांतील अस्वच्छतेमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. बाजारांत स्वच्छता गृहासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. यामुळे विशेषत: महिलांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते.(प्रतिनिधी)