शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

उस्मानला नाकारली याकूबची भेट

By admin | Updated: July 29, 2015 02:49 IST

कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला.

कारागृह प्रशासनाची भूमिका : वकिलालाही टाळलेनागपूर : कारागृह प्रशासनाने विशिष्ट कारणाचा हवाला देत मंगळवारी उस्मान मेमन आणि त्याच्या वकिलाला याकूब मेमनची भेट घेऊ देण्यास नकार दिला. रात्री ६.४५च्या सुमारास ही घडामोड उघड झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. डेथ वॉरंटच्या वृत्तासोबतच याकूबला ३० जुलैला फाशी दिली जाणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यापासून त्याचे नातेवाईक आणि वकिलांनी कारागृहात येऊन याकूबची भेट घेण्यासाठी धावपळ चालवली आहे. या मालिकेत सर्वप्रथम २० जुलैला याकूबचा नातेवाईक उस्मान मेमन याने अ‍ॅड. अनिल गेडामसोबत कारागृहात याकूबची भेट घेतली. २१ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास दिल्लीतील वकील शुबेल फारूख यांनी याकूबची कारागृहात भेट घेऊन क्युरेटिव्ह पिटीशनच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा केली. यावेळी शुबेल यांच्यासोबत उस्मान कारागृहात गेला होता. दुपारी सर्वोच्च न्यायालयाने याकूबची क्युरेटिव्ह पिटीशन खारीज केली. त्यानंतर सायंकाळी अ‍ॅड. अनिल गेडाम पुन्हा कारागृहात गेले. यावेळी गेडाम यांनी याकूबची भेट घेत त्याचा दयेचा अर्ज राज्यपालांकडे पाठविण्यासाठी कारागृह अधीक्षकांकडे दिला. २३ जुलैला याकूबची पत्नी रहिन आणि मुलगी जुबेदासह पाच नातेवाईकांनी याकूबची कारागृहात भेट घेतली. २४ ते २७ जुलै या दिवसात याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर देश-विदेशात उलटसुलट चर्चा सुरू होती. मंगळवारी २८ जुलैला दुपारी ४.१५ ला उस्मान मेमन पुन्हा याकूबची भेट घेण्यासाठी कारागृहात पोहचला. त्याच्यासोबत अ‍ॅड. गेडामही कारागृहाच्या आत गेले. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा होते, त्याकडे प्रसार माध्यमाचे लक्ष लागले होते. सायंकाळी ६.४५च्या सुमारास उस्मान आणि अ‍ॅड. गेडाम बाहेर आले. तेव्हा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे धाव घेतली. प्रश्नांची सरबत्ती झाल्यानंतर उस्मान याने आज याकूबची भेट झाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता ‘थँक्यू‘ म्हणत तो कारमध्ये बसून निघून गेला. (प्रतिनिधी)तांत्रिक कारण : गेडाम तीन तास कारागृहात असलेल्या उस्मानला कारागृह प्रशासनाने याकूबची भेट का घेऊ दिली नाही, ते जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधीने कारागृहाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून खुलासा होऊ शकला नाही. तर, अ‍ॅड. गेडाम यांनी ‘तांत्रिक कारणामुळे‘ भेट नाकारल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला.