शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सतीश उकेंचा प्लॉट जप्त करण्याचा आदेश

By admin | Updated: May 3, 2017 02:41 IST

वादग्रस्त वकील सतीश उके यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा अंमलात आणण्यासाठी मुंबई ...

हायकोर्ट : शिक्षा अमलात आणण्यासाठी कडक भूमिका नागपूर : वादग्रस्त वकील सतीश उके यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात सुनावण्यात आलेली शिक्षा अंमलात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक भूमिका घेणे सुरू केले आहे. न्यायालयाने मंगळवारी उके यांचा भोकारा येथील प्लॉट जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी न्यायालयाने उके यांना दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास अशी शिक्षा सुनावली. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. उके यांना पकडून गजाआड करण्यासाठी वॉरन्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस उके यांचा शोध घेत असून ते अद्याप मिळाले नाहीत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. अ‍ॅड. जगतापांवर कारवाई करण्याचे निर्देश उके यांच्यासाठी अवैधपणे कार्य करणारे अ‍ॅड. व्ही. डी. जगताप यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलला दिलेत. तसेच, जगताप यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च ठोठावला. कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठी कौन्सिलला ९ जूनपर्यंत वेळ देण्यात आला. जगताप यांनी स्वत:च्या स्वाक्षरीचा वकालतनामा न जोडता उके यांचे दोन अर्ज न्यायालयात दाखल केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस तामील होऊनही ते न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी न्यायालयाने पुढील कारवाई केली. (प्रतिनिधी) काकड यांनी मागितली क्षमा उके यांच्यासाठी अवैधपणे कार्य करणारे दुसरे वकील अ‍ॅड. आर. एस. काकड यांनी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित राहून मौखिक क्षमा मागितली. यानंतर त्यांना लेखी क्षमापत्र सादर करण्यासाठी १४ जूनपर्यंत वेळ देण्यात आला. काकड हे मुंबईत नोटरी आहेत. उके यांचे अर्ज काकड यांनी नोंदणीकृत केले होते. त्यापैकी एका अर्जातील पहिल्याच परिच्छेदात उके यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेचा उल्लेख होता. त्यामुळे उके हे न्यायालयाला सहकार्य करीत आहेत किंवा नाही याची पूर्ण शहानिशा करूनच काकड यांनी अर्ज नोंदणीकृत करणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. परिणामी न्यायालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.