शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या हेल्पलाइनवर समोसा, पिझ्झाच्या ऑर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

लोकमत विशेष आनंद शर्मा नागपूर : हॅलो, रेल्वे सुरक्षा दलाकडून बोलतोय, आम्ही आपली काय सहायता करू शकतो? ... सर, ...

लोकमत विशेष

आनंद शर्मा

नागपूर : हॅलो, रेल्वे सुरक्षा दलाकडून बोलतोय, आम्ही आपली काय सहायता करू शकतो? ... सर, एक समोसा व पिझ्झाची ऑर्डर द्यायची होती, मिळेल काय?... रेल्वे सुरक्षा दलाच्या हेल्पलाइन क्रमांकावर अशा प्रकारच्या ऑर्डर्सनी सध्या सुरक्षा दलाच्या जवानांना वैताग आणला आहे. सुरक्षा किंवा आरोग्याच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाइनचा वापर नागरिक मस्करीसाठी करीत आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्षातील आरपीएफ जवानही त्रस्त झाले आहेत.

रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)च्या हेल्पलाइन क्रमांक १८२ची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. प्रवाशांना प्रवासात येणाऱ्या अडचणी तसेच गुन्ह्यांबाबत आरपीएफकडे तक्रार करण्यासाठी या हेल्पलाइनची सुरुवात करण्यात आली. परंतु नागरिकांनी या हेल्पलाइन क्रमांकाला मस्करी करण्याचे साधन समजून त्याचा वापर सुरू केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर जवळपास ७० टक्के बनावट कॉल्स येत आहेत. या कॉल्सच्या माध्यमातून रेल्वे हेल्पलाइनवर समोसा, बर्गर, पिझ्झाची ऑर्डर देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरपीएफच्या सुरक्षा हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून प्रवासी ज्या वस्तूंची मागणी करीत आहेत, त्यात मोबाइल रिचार्ज करणे, समोसा-पिझ्झा पोहोचविण्याची मागणी आदींचा समावेश आहे. यासोबतच ते बर्गर, चहा, ज्यूस, थंड पाण्याची मागणी करीत आहेत. काही प्रवासी तर वीजबिल जमा करणे, सिलिंडर कनेक्शनसाठी बुकिंग करणे किंवा रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी आरपीएफची मदत मागतात. हेल्पलाइनवर रेल्वेत नोकरीसाठीही विचारपूस करण्यात येते. नागपूर आरपीएफ कंट्रोल रूममध्ये दररोज सरासरी दोन कॉल येतात. पूर्वी ही संख्या अधिक होती. कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाल्यामुळे कॉलही कमी झाले आहेत. महिनाभरातील एकूण कॉलपैकी ७० टक्के कॉल्स बनावट असतात. आरपीएफचा हा हेल्पलाइन क्रमांक देशव्यापी आहे. परंतु बहुतांश वेळा त्यास आरपीएफ सुरक्षा क्रमांकाऐवजी प्रवासी त्याचा उपयोग रेल्वेतील चौकशीसाठी करीत आहेत. या हेल्पलाइन क्रमांकाचा मुख्य उद्देश काय आहे हेच नागरिकांना माहीत नसल्यामुळे ते विनाकारण भलत्याच चौकशी करण्यासाठी याचा वापर करीत आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

..............

७० टक्के कॉल्स बनावट

‘आरपीएफच्या हेल्पलाइनवरून नियंत्रण कक्षात दररोज दोन कॉल्स येत आहेत. कोरोनापूर्वी अधिक कॉल्स येत होते. महिनाभरातील कॉल्सपैकी ७० टक्के कॉल्स पिझ्झा, समोस्याची ऑर्डर, रेल्वेगाडी उशिराने धावणे, तिकीट बुक करणे, सिलिंडर बुक करणे, रेल्वेत नोकरी लावणे, कोचची सफाई करणे याबाबत येत आहेत. पूर्वीपेक्षा हे कॉल्स १० टक्के कमी झाले आहेत. अशा स्थितीत संबंधित प्रवाशांना आरपीएफचे जवान हा सुरक्षा क्रमांक असल्याचे सांगतात. सोबतच रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी हेल्पलाइनबाबत जनजागृती करण्यात येते.’

- आशुतोष पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, नागपूर

आरपीएफ हेल्पलाइनचे फायदे

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत काही दुर्घटना घडल्यास त्यांना सुरक्षेची गरज भासते. अशा वेळी आरपीएफच्या हेल्पलाइन क्रमांक १८२ वर कॉल केला जाऊ शकतो. वैद्यकीय मदतीसाठी १३९ हेल्पलाइनवर कॉल करून १ नंबरचा पर्याय निवडावा लागतो. कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी २ नंबरचा पर्याय निवडण्यासाठी सांगण्यात येते.

.........