शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगदंबा अ‍ॅग्रोला बियाणे विक्रीबंदीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:08 IST

कळमेश्वर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी केंद्रांना बियाणे विक्री करावयाची असताना तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक स्वमर्जीने विक्री करीत ...

कळमेश्वर : शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार कृषी केंद्रांना बियाणे विक्री करावयाची असताना तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालक स्वमर्जीने विक्री करीत असल्याने कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाने मोहपा येथे जगदंबा अ‍ॅग्रोची तपासणी केली असता त्यांना त्रुटी आढळून आल्याने या केंद्राला विक्रीबंदीचा आदेश दिला आहे. खरीप हंगाम २०२१-२२ च्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून योग्य त्या निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यात कृषी भरारी पथकाची स्थापना करून पथकाच्या माध्यमातून कृषी केंद्राची तपासणी सुरू आहे. तालुक्यात ७८ कृषी निविष्ठाधारकांची संख्या असून यामध्ये ६९ खासगी व ९ सहकारी केंद्र आहेत. या तपासणीदरम्यान मोहपा येथील जगदंबा अ‍ॅग्रोची तपासणी केली असता काही त्रुटी आढळून आल्या. यात कापूस बियाण्यांची विक्री ही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जून २०२१ पासून करावयाची होती. परंतु जगदंबा अ‍ॅग्रोने २४ मेपासूनच कापूस बियाण्यांची विक्री केली असल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. यामुळे सदर कृषी केंद्राला विक्री बंदचा आदेश देण्यात आला. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी उमाकांत हातांगळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी दीपक जंगले यांनी केली.