शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

बायपासला पर्याय लेफ्टमेन अ‍ॅन्जीओप्लास्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:48 IST

ब्लॉकेजेस जास्त असतील तर रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु ह्रदयशस्त्रक्रियेसंदर्भात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बायपासला पर्याय म्हणुन लेफ्टमेन अ‍ॅन्जीओप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया पुढे आली आहे.

ठळक मुद्देडॉ. जसपाल अर्नेजा : ह्रदयशस्त्रक्रियेच्या अद्ययावत पद्धतीची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ब्लॉकेजेस जास्त असतील तर रुग्णांना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. परंतु ह्रदयशस्त्रक्रियेसंदर्भात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे बायपासला पर्याय म्हणुन लेफ्टमेन अ‍ॅन्जीओप्लॅस्टी ही शस्त्रक्रिया पुढे आली आहे. या शस्त्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बायपासपेक्षा कमी खर्च, कमी वेदना आणि दुसºयाच दिवशी रुग्ण घरी असतो, असा दावा अर्नेजा हार्ट अ‍ॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी केला.हृदयरोगावर उपचाराच्या क्षेत्रात आमूलाग्र क्रांती झाली आहे. उपचाराच्या अद्ययावत पद्धतींची उदयोन्मुख डॉक्टरांना माहिती व्हावी आणि रुग्णांनाही त्याचा लाभ मिळावा, या उद्देशाने अर्नेजा हार्ट अ‍ॅन्ड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे शनिवारी हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मध्य भारतातील १५ हृदयरोग तज्ज्ञ या कार्यशाळेत सहभागी झाले होते. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि रुग्णालयाचे संचालक डॉ. जसपाल अर्नेजा यांनी सादरीकरणाद्वारे हृदयरोगावर उपचाराच्या अत्याधुनिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, व्यस्त जीवनशैलीमुळे हृदयरोगाशी संबंधित गुंतागुंतही वाढत आहे. देशात अ‍ॅन्जिओप्लास्टी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी लेफ्टमेन अ‍ॅन्जिओप्लास्टी फार कमी डॉक्टर करतात.मध्यभारतात अर्नेजा रुग्णालयाने सर्वप्रथम लेफ्टमेन अ‍ॅन्जिओप्लास्टी सुरू केली. आजवर ४०० हून अधिक रुग्ण हाताळण्यात आले आहेत. वाढत्या वयोमानासोबतच आर्टरीमध्ये निर्माण होणारे ब्लॉकेजेस कॅल्शियममुळे अगदी दगडासारखे होतात. त्यावर रोटाब्लेशनचा पर्याय उपलब्ध आहे.या पद्धतीत अगदी अ‍ॅन्जिओप्लास्टीप्रमाणेच ‘डायमंड पार्टीकल’ प्रतिमिनिट दीड ते दोन लाख रोटेशन येवढ्या गतीने फिरवून ब्लॉकेजेस काढून घेतले जातात. आतापर्यंत १५० ते २०० रुग्णांवर रोटाब्लेशनद्वारे उपचार करण्यात आले आहे. रोटाब्लेशन अथवा लेफ्टमेन अ‍ॅन्जिओप्लास्टीसाठी ‘आयव्हास’ करणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्टरीतील ब्लॉकेजेसची अगदी सूक्ष्मपद्धतीने माहिती मिळते.