शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधात शिवसेनेत खदखद

By admin | Updated: August 13, 2016 02:07 IST

भाजपकडून सातत्याने अन्याय होत आहे. वेळोवेळी डावलले जात आहे. महापालिकेत शिवसेनेची कामे होत नाही.

संपर्क प्रमुख परब यांच्याकडे मांडल्या व्यथा : लढण्यासाठी ताकद द्या नागपूर : भाजपकडून सातत्याने अन्याय होत आहे. वेळोवेळी डावलले जात आहे. महापालिकेत शिवसेनेची कामे होत नाही. स्थानिक भाजप नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्याची कामे होऊ देत नाही, अशी खदखद शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुख आ. अनिल परब यांच्याकडे व्यक्त केली. भाजप शिवसेना संपवायला निघाली आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्याशी युती न करता स्वबळावर लढण्यासाठी आम्हाला ताकद द्या, अशी गळही परब यांना घालण्यात आली. परब शुक्रवारी नागपुरात आले. सकाळी रविभवनात काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतरर दुपारी नगरसेवक किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, अलका दलाल, जगतराम सिन्हा यांनीही परब यांची भेट घेतली. महापालिकेत शिवसेनेला सातत्याने डावलले जात आहे. शिवसेना नगरेवकांची कामे केली जात नाही. सभागृहात शिवसेना सदस्यांचा कोणताही प्रश्न आला तर त्यांना बोलू दिले जात नाही. उचललेल्या प्रश्नाची दखल घेऊन न्याय दिला जात नाही, अशी तक्रार नगरसेवकांनी परब यांच्याकडे केली. भाजपने महापालिकेत अनेक घोटाळे केले आहेत. येत्या काळात या घोटाळ्यांविरोधात आंदोलन उभारण्यासाठी पक्षातर्फे पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली. रविभवनात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुख सतीश हरडे, नगरसेवक किशोर कुमेरिया, जगतराम सिन्हा, शहर प्रमुख सुरज गोजे, उपशहर प्रमुख किशोर राठोड, वसंता डोंगरे, महिला अध्यक्ष सुरेखा खोब्रागडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी परब यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला. महापालिकेच्या निवडणुकीसाठी किती जागा लढविता येतील, किती जागा निवडून येऊ शकतील, किती ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतील, अशा संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे निर्देशही परब यांनी दिले. चांगले लोक पक्षाशी जोडण्यासाठी पुढाकार घ्या. १६ आॅगस्टपासून सदस्य नोंदणी मोहीम सुरू होत आहे. त्यात पुढाकार घ्या, अशा सूचनाही दिल्या. निवडणुकीची तयारी करायची आहे. युतीचा विषय हा पक्षश्रेष्ठींचा आहे. पण स्वबळावर लढण्याची वेळ आली तर प्रत्येक वॉर्डात आपली ताकद हवी. त्यासाठी आतापासून कामाला लागा, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)