शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक अडथळे आणणारच, कार्य करत रहा!

By admin | Updated: June 9, 2017 02:31 IST

केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक ...

सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’ : पंतप्रधान मोदींना शाबासकीची थापलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाच्या कार्यप्रणालीवर विरोधकांकडून चहूबाजूंनी टीका होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शाबासकीची थाप दिली आहे. गेल्या काही काळापासून देशात आशादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र काही लोकांना त्यातून नुकसान होत आहे. ते विविध माध्यमातून प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्याकडे लक्ष न देता कार्यावर आणखी भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले.संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाचा गुरुवारी सायंकाळी रेशीमबाग मैदान येथे समारोप झाला. याप्रसंगी नेपाळचे माजी लष्करप्रमुख रुग्मांगुद गटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. याशिवाय आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, आसामचे वित्तमंत्री हेमंत बिस्वास शर्मा, महिंद्रा उद्योग समूहाचे चेअरमन आनंद आनंद महिंद्रा, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का प्रामुख्याने उपस्थित होते.गेल्या काही काळापासून देश सुरक्षा तसेच आर्थिक क्षेत्रात मजबूत होत आहे. लोकांच्या आशाआकांक्षा जागृत करण्याचे काम होत आहे. मात्र अजूनही बरेच मैल गाठायचे आहेत. मात्र या प्रगतीमुळे काही लोकांच्या स्वार्थाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे ते लोकांमध्ये गैरसमज पसरवून किंवा बुद्धिभेद करुन अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत, या शब्दांत सरसंघचालकांनी विरोधकांचे नाव न घेता टीका केली. केवळ संघाचे स्वयंसेवक काम करत आहेत, म्हणून प्रगती होईल असे नाही. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. भारताची संस्कृती वैभवशाली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे व निश्चितच यात महाशक्ती होण्याची क्षमता आहे, असे मत गटवाल यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी पृथ्वीराजसिंह, विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. यंदाचा तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग १५ मे पासून सुरू झाला. या वर्गात देशभरातून १८ ते ४० वर्षे वयोगटातील ९०३ स्वयंसेवक सहभागी झाले होते. या स्वयंसेवकांनी सुरुवातीला दंड, नियुद्ध, योगासन इत्यादींची शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली.काँग्रेसने आणला होता गोवंशहत्याबंदीचा प्रस्तावगोहत्येबाबत देशभरात राजकारण तापताना दिसून येते. गोवंशहत्याबंदीबाबत सरसंघचालकांनी यावेळी एक माहिती दिली. संघाची स्थापना होण्याच्या पाच वर्षेअगोदर १९२० साली नागपुरात महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. डॉ. हेडगेवार यांच्याकडे अधिवेशनाच्या व्यवस्थेची जबाबदारी होती. संपूर्ण स्वातंत्र्याचा यात एक प्रस्ताव होताच. मात्र संपूर्ण गोवंशहत्याबंदीचादेखील प्रस्ताव मांडण्यात आला होता, असे सरसंघचालकांनी सांगितले.सरसंघचालकांचे अमेरिकेवर टीकास्त्रजागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पॅरिस पर्यावरण करारातून अमेरिकेने माघार घेतली आहे. या मुद्यावर सरसंघचालकांनी अमेरिकेच्या धोरणांवर जोरदार टीका केली. पर्यावरणाचा समतोल राखण्याची भाषा करणारे त्या भूमिकेवर जुळले राहत नाही. स्वार्थ मध्ये आला आणि त्यांनी करारातून काढता पाय घेतला, या शब्दांत सरसंघचालकांनी अमेरिकेचे थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले. भारताला कितीही नुकसान सहन करावे लागले तरी पर्यावरण रक्षणाची भूमिका सोडणार नाही, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.