शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

परवाना शुल्क वाढीला आॅटोचालकांचा विरोध

By admin | Updated: February 24, 2016 03:25 IST

महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करुन शासनाने नवी अधिसूचना काढली आहे. यात वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली आहे.

अध्यादेश मागे घ्या, अन्यथा आंदोलन : विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनचे धरणेनागपूर : महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करुन शासनाने नवी अधिसूचना काढली आहे. यात वाहन परवाना शुल्कात १० ते १०० पट वाढ केली आहे. ही वाढ आॅटोचालकांचे कंबरडे मोडणारी आहे. शासनाने हा अध्यादेश मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशनच्यावतीने मंगळवारी संविधान चौकात आयोजित धरणे आंदोलनातून दिला.फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी सांगितले, विदर्भातील ११ जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांची आर्थिक व व्यावसायिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. यातच अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण जात आहे. ई-रिक्षा, कॅब, सहा आसनी आॅटोरिक्षा व खासगी आॅटोरिक्षामुळे अधिकृत आॅटोचालकांना आॅटोरिक्षा चालविणे कठीण झाले आहे.यातच नव्या अध्यादेशानुसार आता पूर्वी आॅटोरिक्षा परवान्याच्या नुतनीकरणाला २०० रुपये शुल्क आकारले जायचे ते आता नव्या आदेशाप्रमाणे १००० रुपये झाले आहे. मासिक दंडाचे १०० रुपये शुल्क असताना ते ५००० रुपये दंड निर्धारित करण्यात आले आहे. परमिट न घेणाऱ्यांना पूर्वी २०० रुपये शुल्क होते ते आता १० हजार रुपये करण्यात आले आहे. हा अध्यादेश विदर्भातील आॅटोचालकांवर अन्याय करणार आहे. शासनाने या अधिसूचनेतून आम्हाला वगळावे, अशी मागणी आहे, असेही ते म्हणाले.धरणे आंदोलनात ६०० आॅटोचालकांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर फेडरेशनचे शिष्टमंडळ विलास भालेकर यांच्या नेतृत्वात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना भेटून मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी महासचिव रविशंकर रामटेके, आनंद चौरे, मुकुंदा उईके, राजेंद्र खांडेकर, हेमराज मुनेश्वर, अरुण हिरेखन, संजय मेश्राम, देवा निखाडे, इलियास लोधी, राजू पडगिलवार, मनोज डांगे, सुदाम बोरकर, पप्पू मिश्रा, अब्बास भाई, सुशील समुद्रे, इस्तारी कावळे, फारुख शेख, फिरोज पठाण, सुभाष गायकवाड, संजय तागडे, बाबू गणवीर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)