शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

- तरच होईल भाजपशी युती

By admin | Updated: November 7, 2016 02:19 IST

भाजपा व रिपाइं (आठवले) यांची राज्यात युती आहे. स्वत: आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत.

रिपाइं (आ) ला हवे सन्मानपूर्वक जागा वाटप : इतर पर्यायांचाही विचार आनंद डेकाटे  नागपूरभाजपा व रिपाइं (आठवले) यांची राज्यात युती आहे. स्वत: आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत युती करायची की नाही, याचा निर्णय आठवले यांनी स्थानिक नेतृत्वावर सोपविला आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता यंदा सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच भाजपासोबत युती करायची, अशी ठाम भूमिका स्थानिक नेतृत्वाने घेतली आहे. त्यामुळे नागपूरचा विचार केला असता भाजपा-रिपाइं(आ) यांची युती होणार की नाही, याचा निर्णय सध्यातरी गुलदस्त्यात आहे. युती न झाल्यास रिपाइं आठवले इतर पर्यायांचाही विचार करीत आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत आठवले यांच्या रिपाइंसोबत भाजपाची युती झाली. तेव्हा ही युती तशी घाईघाईनेच झाली होती. यात शिवसेनासुद्धा होती. नागपूरमध्ये आठवले यांच्या पक्षाला एकूण पाच जागा सोडण्यात आल्या होत्या. परंतु यापैकी काही जागा अशा होत्या ज्या पक्षाने मागितलेल्याच नव्हत्या. या पाचपैकी आठवलेंच्या पक्षाकडून एकमेव सरोज राजू बहादुरे या निवडून आल्या. परंतु ही जागा सुद्धा भाजपाच्या एबी फॉर्मवर लढवली गेली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या त्या भाजपाच्या नगरसेविका झाल्या. एक मोमीनपुराची जागा सोडण्यात आली होती. ती मागण्यातच आलेली नव्हती. उत्तर नागपुरातील तीन जागा लढवण्यात आल्या. यात एकही जागा निवडून आली नाही. अशा प्रकारे युतीच्या नावावर भाजपाने रिपाइं (आ)सोबत दगाफटका केला, असा कार्यकर्त्यांचा आरोप असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये भाजपाबद्दल नाराजी आहे. यंदाही तसेच घडत असेल तर युती करायचीच कशासाठी, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे. नागपूर शहरात एकूण ३० जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असून यापैकी किमान १५ ते २० जागा द्याव्या तसेच ओबीसी व सर्वसाधारण पैकी किमान ५ अशा २५ जागा रिपाइं (आ) ला मिळाव्या, अशी पक्षाची भूमिका आहे. यात थोडाफार बदल होऊ शकेल. परंतु सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती करायची, अशी ठाम भूमिका पक्षाने घेतलेली आहे. युती झाली तर ठीक अन्यथा इतर लहान पक्षासोबत आघाडी करून निवडणूका लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. २५ जागा हव्यायुतीसंदर्भात आम्ही आग्रही आहोत. भाजपासोबत अजूनपर्यंत कुठलीही अधिकृतपणे चर्चा झलेली नाही. परंतु मागच्या निवडणुकीतील आमचा अनुभव चांगला नाही. यंदा किमान २५ जागांची आमची मागणी आहे. सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात, यावर आम्ही ठाम आहोत. युती झाली तरी आमचा उमेदवार कुठल्याही परिस्थितीत भाजपचा एबी फॉर्म वापरणार नाही. आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. तसेच युती न झाल्यास इतर पर्यायांचाही विचार केला जाईल. स्वबळावर लढण्याऐवजी इतर पक्ष व संघटनांसोबत आघाडी तयार करून निवडणूक लढवणार. - भूपेश थूलकर प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ)