शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच पेपर खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. तसेच परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच (स्टँम्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. तसेच परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच (स्टँम्प व्हेंडर) मुद्रांक पेपर खरेदी करण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. बी. मुळे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबत नुकतीच एक बैठक घेतली होती. निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने विकल्या गेल्याच्या तक्रारी आल्यास व अन्य गैरव्यवहार केल्यास मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे व कारवाई करण्याचे संकेत दिले होते. शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या अधिनस्त एकूण ५३ परवानाधारक मुद्रांक विक्रेते कार्यरत आहेत.

कोषागारात मुबलक मुद्रांक साठा असून परवानाधारकांनी एक लाख रुपयापर्यत ग्रास प्रणालीतून ई-चलान भरल्यानंतर मुद्रांक साठा प्राप्त झाल्यानंतर लगेच दुसरी चलान कोषागारात सादर करावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद गोडे यांनी कळवले आहे.

परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याव्यतिरिक्त इतर व्यक्तीकडून मुद्रांक खरेदी करू नयेत. तसेच त्यांनी जादा पैशाची मागणी केल्यास संबंधित सहदुय्यम निबंधक कार्यालयास तक्रार द्यावी.

नागरिकांना आवश्यक कामासाठी लागणारे मुद्रांक ई-पेमेंटव्दारे खरेदी करता येतील. याबाबतची कार्यपध्दती नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट आयजीआर महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट इन वर उपलब्ध आहे.