शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

१३ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

योगेश पांडे नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५०० हून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा ...

योगेश पांडे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ५०० हून अधिक महाविद्यालयांचा समावेश आहे. संलग्नित महाविद्यालयांच्या दर्जावर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात येतात. मात्र ‘लोकमत’च्या हाती आलेली माहिती यावर शिक्कामोर्तब करणारीच आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण महाविद्यालयांपैकी केवळ १३ टक्के महाविद्यालयेच ‘नॅक’च्या श्रेणीत आहेत. त्यातही ‘अ प्लस’ श्रेणीतील महाविद्यालयांची संख्या ही अवघी बोटांवर मोजण्याएवढीच आहे. पायाभूत सुविधा, शिक्षक व दर्जाच्या अभावामुळेच महाविद्यालयांकडून ‘नॅक’च्या मूल्यांकनासाठी पुढाकार घेण्यात येत नसल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली आहे.

सद्यस्थितीत नागपूर विद्यापीठात ५०३ महाविद्यालये आहेत. यापैकी ३५० हून अधिक महाविद्यालये ही १० वर्षांहून अधिक जुनी आहे. १० वर्षे पूर्ण झालेल्यांपैकी अवघ्या ६८ महाविद्यालयांचे ‘नॅक’चे मूल्यांकन झाले असून त्यांना विविध श्रेणी प्राप्त आहे. यातही ‘अ प्लस’ श्रेणी प्राप्त महाविद्यालयांची संख्या अवघी २ इतकीच आहे. या आकडेवारीकडे नजर टाकली असता नागपूर विद्यापीठातील महाविद्यालयांचा दर्जा कसा काय वाढणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक महाविद्यालये

‘नॅक’चे मूल्यांकन झालेल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील ४७ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १३ महाविद्यालये आहेत. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी चार महाविद्यालयांचे मूल्यांकन झाले आहे.

प्रशासनाकडूनदेखील पुढाकार नाही

नागपूर विद्यापीठाने बृहत आराखड्यात २०२४ पर्यंत ४१७ महाविद्यालये ‘नॅक’च्या श्रेणीत आणण्याचे ध्येय मांडले आहे. मात्र यासाठी नेमकी रुपरेषा काय असणार आहे, याबाबत विद्यापीठाने भूमिका उघड केलेली नाही. बहुतांश महाविद्यालयांनी तर ‘नॅक’चे मूल्यांकन करण्यासाठी प्रक्रिया सुरूच केलेली नाही. यासाठी महाविद्यालयांना विद्यापीठानेदेखील ठोस निर्देश दिलेले नाहीत.

कसे होणार मूल्यांकन ?

विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयांपैकी अनेक ठिकाणी तर सुविधांचा प्रचंड अभाव आहे. बहुतांश महाविद्यालयांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. अनेक महाविद्यालयांत तर पायाभूत सुविधादेखील हव्या तशा नाहीत. त्यातच ‘कोरोना’मुळे महाविद्यालयांचे कंबरडे मोडल्या गेले आहे. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अशा स्थितीत महाविद्यालये कुठल्या आधारावर ‘नॅक’च्या मूल्यांकनाला सामोरे जातील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशा आहेत ‘नॅक’च्या श्रेणी

जिल्हा - अ प्लस - अ - ब प्लस प्लस - ब प्लस - ब - क

नागपूर - २ - ४ - १० - १० - १४ - ७

वर्धा - ० - १ - ० - ६ - ४ - २

भंडारा - ० - ० - ० - ० - ३ - १

गोंदिया - ० - ० - ० - ० - २ - २