शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

३१ मेपूर्वी होणार शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST

सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष व एका शाळेत ५ वर्ष वास्तव्याची अट नागपूर : जि.प. शिक्षकांच्या ...

सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्ष व एका शाळेत ५ वर्ष वास्तव्याची अट

नागपूर : जि.प. शिक्षकांच्या ३१ मेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाकडून ७ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आला आहे. शिक्षकांच्या बदलीबाबत यापूर्वीचा २७ फेब्रुवारी २०१७ चा शासन निर्णय प्रचंड वादग्रस्त ठरला होता. त्यामुळे या शासन निर्णयात बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने करण्यात आली होती. त्यामुळे शासनाकडून जि.प. पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या शासन निर्णयातील तरतुदीमध्ये बऱ्याच सुधारणा करून नवीन शासन निर्णय तयार केला आहे. नव्याने निर्गमित शासन निर्णयाबाबतसुद्धा शिक्षक व शिक्षक संघटनांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत.

- यांच्या होतील बदल्या

नवीन शासन निर्णयातील तरतुदी व मार्गदर्शक सूचनानुसार सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षांची सेवा व एका शाळेत ५ वर्षांची सेवा पूर्ण करणारे तसेच अवघड क्षेत्रात ३ वर्ष सेवा पूर्ण करणारे शिक्षक बदलीकरिता पात्र ठरणार आहेत. २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी बदलीपात्र शिक्षकांची संख्या कमी राहणार आहे. कर्मचाऱ्याच्या जोडीदारास गंभीर आजार असल्यास अशा कर्मचाऱ्यांना संवर्ग १ चा लाभ मिळणार आहे. तर संवर्ग २ चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांचा पुढील बदलीच्या वेळी एक एकक म्हणून बदलीसाठी विचार करण्यात येणार आहे. संवर्ग १ व २ अंतर्गत बदली करणाऱ्यांना पुढील तीन वर्ष बदली करता येणार नाही.

- ५ टप्प्यात बदली प्रक्रिया

बदलीसाठी अर्ज केल्यानंतर ३० ऑप्शन द्यावे लागतील. संवर्गनिहाय बदल्या होतील. प्रत्येक टप्प्यामागे चार दिवसाचा वेळ राहील. प्रत्येक टप्प्यावर जिल्ह्यातील रिक्त जागा दाखविल्या जातील. टप्प्यात ही प्रक्रिया होईल.

- अवघड गावांची संख्या घटणार

अवघड गावांची निश्चिती करण्याकरिता एकूण सात निकष दिले असून, त्यापैकी तीन निकषांची पूर्तता करणाऱ्या गावाचीच अवघड क्षेत्रातील गाव म्हणून निश्चिती होणार असल्याने यावर्षी अवघड गावांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

- खोटी माहिती देणाऱ्या शिक्षकांचे निलंबन

खोटी माहिती सादर करून संवर्ग १ व संवर्ग २ मध्ये बदलीचा लाभ घेतल्यास, अशा शिक्षकांना निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करावी, अशी स्पष्ट तरतूद या शासन निर्णयात करण्यात आली आहे.

- सन २०१८ च्या बदलीतील रँडम व विस्थापित शिक्षकांकरिता सेवाज्येष्ठतेची अट न ठेवता त्यांना संवर्ग १ मध्ये बदलीची संधी द्यावी. बदलीकरिता सेवाज्येष्ठता पात्रता तारीख ३० जून गृहित धरण्यात यावी. तसेच अवघड गावांची निवड करण्याबाबतचे निकष शिथिल करण्यात यावे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा नागपूर