शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘वन रँक वन पेन्शन’ पैशांची नाही प्रतिष्ठेची मागणी

By admin | Updated: August 15, 2015 03:11 IST

सेवानिवृत्त कर्नल व्ही. एन. थापर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ ही पैशांची नाही, प्रतिष्ठेची मागणी आहे

कर्नल व्ही. एन. थापर : सरकारच्या संवेदनहीनतेवर व्यक्त केली खंतनागपूर : सेवानिवृत्त कर्नल व्ही. एन. थापर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ ही पैशांची नाही, प्रतिष्ठेची मागणी आहे असे स्पष्ट करून यासंदर्भात शासनातर्फे संवेदनहीनता दाखविण्यात येत असल्यामुळे खंत व्यक्त केली. सेंट विन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी थापर शहरात आले आहेत. दरम्यान, त्यांनी एका हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधून विविध मुद्यांवर परखड भूमिका मांडली. कारगील युद्धात शहीद झालेले व मरणोत्तर वीरचक्रप्राप्त कॅप्टन विजयंत थापर यांचे ते वडील होय. त्यांनी जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर रायफल बटालीयनचे नेतृत्व केले आहे. सेवानिवृत्त सैनिकांतर्फे दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘वन रँक वन पेन्शन’साठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. याविषयी बोलताना थापर यांनी रोखठोक मत व्यक्त केले. देशातील राजकारणी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करतात. त्यांना भोजन, निवास, वाहने व प्रवास खर्चात सूट मिळत आहे. अशा परिस्थितीत सैनिकांना दोन पैसे जास्त मिळाले तर बिघडले कोठे? सैनिक स्वत:च्या प्राणाची व कुटुंबीयांच्या भविष्याची चिंता त्यागून देशाचे रक्षण करीत असतात. त्यांच्यासंदर्भात शासन ज्याप्रमाणे संवेदनहीनता दाखवित आहे त्याचा सेवारत सैनिकांच्या मनावर वाईट परिणाम पडू शकतो. ही मागणी केवळ पैशांसाठी नसून सैनिकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न त्यासोबत जुळलेला आहे असे थापर यांनी सांगितले. सेवानिवृत्त सैनिक या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून शांततेत व कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे देशाला धोका असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ज्यांनी देशाचे रक्षण केले त्यांच्यामुळे कसा धोका होऊ शकतो. एकीकडे आपण स्वातंत्र दिन साजरा करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे सेवानिवृत्त सैनिकांचा बळजबरीच्या कारवाईद्वारे अवमान केला जात आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनच इतरांच्या तुलनेत सैनिकांना कमी लेखले जात आहे याकडे थापर यांनी लक्ष वेधले.(प्रतिनिधी)