शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

बुटीबोरीत एक कोटींचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - तेलंगणातून महाराष्ट्रात आणण्यात आलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा गांजा नागपूर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - तेलंगणातून महाराष्ट्रात आणण्यात आलेला सुमारे एक कोटी रुपये किमतीचा गांजा नागपूर ग्रामीण पोलिसांनी शनिवारी जप्त केला. रात्रीपर्यंत या संबंधाने कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

विजयवाड्यातील (आंध्रप्रदेश) एका ट्रान्सपोर्टरकडे चंदीगड (पंजाब)च्या व्यावसायिकाला ४५ लाखांची कॉफी पोहचवायची होती. ती ट्रकमध्ये भरून घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी नागपूरकडे ट्रक निघाला. मध्ये खम्मम (तेलंगणा) जवळ गांजा तस्करांनी कॉफीच्या मध्ये सुमारे ११०५ किलो गांजा लपवला. त्यानंतर हा ट्रक पुढे निघताच नागपूर ग्रामीण पोलिसांच्या टिपरने गांजाची मोठी खेप निघाल्याचे सांगितले. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाईची तयारी केली. शनिवारी सकाळी हा ट्रक बुटीबोरी परिसरात येताच पोलीस निरीक्षक जिट्टावार आणि बुटीबोरीचे ठाणेदार ओमप्रकाश कोकाटे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हा ट्रक अडवला. ट्रकमध्ये पाहणी केली असता कॉफीच्या मध्ये गांजा दडवून ठेवल्याचे आढळले. त्यामुळे तो ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

---

आरोपी निश्चित नाही

ट्रकमध्ये आढळलेल्या गांजाची किंमत १ कोटी, ५० हजार रुपये असून दरम्यान, ट्रकची किंमत २० ते २५ लाख रुपये आहे. तसेच त्यात ४५ लाखांची कॉफीही आहे. पोलिसांनी हा सुमारे पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या गांजा तस्करीत ट्रकचालक, क्लिनरसह नेमके किती आरोपी आहे, ते रात्री ११ पर्यंत स्पष्ट झाले नव्हते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तत्पूर्वी, पोलीस त्या सर्वांची भूमिका तपासून बघत आहेत. रविवारी सकाळपर्यंत यासंबंधाने निश्चित माहिती स्पष्ट होईल, असे पोलीस सांगत होते.