शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्याचे हिवाळी अधिवेशन?

By admin | Updated: October 28, 2014 00:27 IST

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नसतानाही प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच अधिवेशन किती आठवड्याचे असेल, हेही ठरलेले नाही. ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या

भाजपवर नागपूर कराराचे पालन करण्याचा दबावनागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली नसतानाही प्रशासन तयारीला लागले आहे. तसेच अधिवेशन किती आठवड्याचे असेल, हेही ठरलेले नाही. ३१ आॅक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर अधिवेशनाची तारीख निश्चित के ली जाईल, अशी अपेक्षा आहे. आजपर्यंत सरकारवर नागपूर कराराचे पालन करीत नसल्याचा आरोप करणाऱ्या भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे यावेळी कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन दीड महिन्याचे राहील, अशी वैदर्भीय जनतेला आशा आहे. नागपूर करारानुसार गतकाळात मध्य प्रदेशची राजधानी राहिलेल्या नागपूर शहराला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा देण्यात आला. यासोबतच येथे विधिमंडळाचे अधिवेशन सहा आठवड्याचे घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळानंतर कोणत्याही सरकारने याचे पालन केलेले नाही.मागील काही वर्षांत हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यातच गुंडाळले जाते. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देणारा भाजप आजवर अधिवेशन सहा आठवड्याचे असावे, अशी सातत्त्याने मागणी करीत आहे. पक्षभेद विसरून विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांनी या मागणीला नेहमीच पाठिंबा दिला आहे. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. भाजप सत्तेत येणार आहे. त्यामुळे अधिवेशन सहा आठवडे चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर येणार आहे. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधिमंडळाचे विशेष सत्र मुंबईत होईल की नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शपथविधी होईल, याबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, विदर्भ राज्य जॉर्इंट अ‍ॅक्शन कमिटीचे संयोजक अहमद कादर यांनी हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विदर्भातील आमदारांशी संपर्क साधून त्यांना याची जाणीव करून देणार असल्याची माहिती कादर यांनी दिली.(प्रतिनिधी)