शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींच्या यंत्राला रुग्ण मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:07 IST

नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘ऑस्टिओपोरोसिस’चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ...

नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात महिलांसोबत पुरुषांमध्येही ‘ऑस्टिओपोरोसिस’चे प्रमाण मोठे आहे. अशा रुग्णांमध्ये ‘हिप फ्रॅक्चर’ केव्हाही होऊ शकते. ‘डेक्सा स्कॅन’ या चाचणीद्वारे हाताची दोन्ही मनगटे, कंबरेचे हाड, पाठीचा कणा या सांध्याच्या मजबुतीची माहिती करून घेता येते. हाडांच्या रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेले ‘डेक्सा स्कॅन’ यंत्र मेडिकलच्या सेवेत २०१७ पासून रुजू झाले. परंतु औषधवैद्यकशास्त्र विभाग (मेडिसीन) व अस्थिव्यंगोपचार विभाग (ऑर्थाेपेडिक) सोडल्यास इतर विभागाला या यंत्राचे वावगे असल्याचे चित्र आहे. परिणामी, दीड कोटीच्या यंत्राला आवश्यकतेप्रमाणे रुग्ण मिळेनासे झाले आहे.

मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. रुग्णांच्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे, चांगले उपचार मिळावेत म्हणून १५० कोटींच्या पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेतून मेडिकलच्या डॉक्टरांनी ‘डेक्सा स्कॅन’ यंत्राची मागणी केली. ‘डेक्सा स्कॅन’ म्हणजेच ‘ड्युअल एनर्जी एक्स-रे अ‍ॅब्लॉस्प्रिओमिटरी’. रुग्णाला होणारा हाडांचा त्रास व लक्षणे याचे निदान करण्यास हे यंत्र मदत करते. फेब्रुवारी २०१७ मध्ये मेडिकलमध्ये हे दीड कोटीचे यंत्र रुग्णसेवेत दाखल झाले. या अद्ययावत यंत्रामुळे‘ऑस्टिओ पॅनिया’, ‘ऑस्टिओपोरोसिस’ आणि रजोनिवृत्तीमुळे हाडांची घनता कमी होणाऱ्या रुग्णांचे निदान केले जाते. ‘डेक्सा स्कॅन’मुळे रुग्णाला पॅथालॉजिकल चाचण्या करण्याची गरज भासत नाही. शिवाय एक्स-रेच्या तुलनेत या उपकरणातून होणारा किरणोत्सर्गदेखील अत्यंत कमी स्वरूपात असतो. एका क्लिकवर हाडांची घनता मोजता येते. उपराजधानीत हे यंत्र मेडिकलसह आणखी दोन खासगी केंद्रात आहेत. खासगीच्या तुलनेत मेडिकलमध्ये माफक दरात उपलब्ध आहे. यामुळे या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होईल व रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु मेडिसीन व ऑर्थाेपेडिक विभाग सोडल्यास इतर विभागातून रुग्ण पाठविलेच जात नसल्याची माहिती आहे. यामुळे रोज चार-पाच रुग्णांचीच तपासणी होत आहे. विशेष म्हणजे, या यंत्राचा सर्वाधिक फायदा महिलांसाठी व्हायला हवा होता. परंतु स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभागासह इतरही विभागाचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. कोट्यवधीचे हे उपकरण बंद तर पडणार नाही ना, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.