केळवद : चाेरट्याने कंपनीच्या आवारात प्रवेश करून आतील विजेचे ट्रान्सफाॅर्मर फाेडले आणि त्यातील ऑईल व तांब्याच्या प्लेट चाेरून नेल्या. त्या साहित्याची एकूण किंमत १ लाख ८९ हजार २०० रुपये आहे. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भागेमाहेरी शिवारात शनिवारी (दि. १) मध्यरात्री घडली.
भागेमाहेरी (ता. सावनेर) शिवारात प्रावेस नामक कंपनी आहे. कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने त्या कंपनीच्या आवारात प्रवेश केला. यात त्याने आवारातील विजेचे ट्रान्सफाॅर्मर फाेडले आणि त्यातील ६३० लिटर ऑईल व तांब्याच्या २० प्लेटा असा एकूण १ लाख ८९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच सुरक्षा रक्षक रूपेश रुपचंद परतेकी (२८, रा. भागेमाहेरी) याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार रामराव पवार करीत आहेत.