शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची चाळण अन् अधिकारी म्हणतात, फक्त ३,३६० खड्डे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:10 IST

शहरातील रस्त्यांवरील ५,४६५ खड्डे बुजविल्याचा दावा : इन्स्ट्रा मशीन खरेदी करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण ...

शहरातील रस्त्यांवरील ५,४६५ खड्डे बुजविल्याचा दावा : इन्स्ट्रा मशीन खरेदी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच भागातील डांबरी रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार शहरात फक्त ३,६६० खड्डे शिल्लक आहेत.

पावसाळा आला की शहरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडतात. हा दरवर्षीचा अनुभव आहे. पावसाळ्याच्या दिवसात मनपाचा हॉटमिक्स प्लांट बंद राहत असल्याने जेट पॅचर व रोड इन्स्ट्रा पॅचर मशीनचा वापर करून खड्डे बुजविले जातात. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत रोड इन्स्ट्रा पॅचरद्वारे शहरातील खड्डे बुजविण्याच्या १ कोटी ९८ लाख ९५ हजार ४९५ रुपयाच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. ९०० रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे खड्डे बुजविले जाणार आहे.

शहरातील अजनी रेल्वे पुलावरील खड्डे चार दिवसापूर्वी बुजवण्यात आले. यातील गिट्टी पुन्हा बाहेर पडली आहे. बोर्ड ऑफीस चौकाकडून संविधान चौकाकडे तसेच आकाशवाणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. अंबाझरी, एलएडी चौक, लेडीज क्लब चौक, सिव्हिल लाईन्स, बेसा, आदिवासी गोवारी पुलाखालील रस्ता, झिंगाबाई टाकळी, देवनगर, खामला चौक यासह शहरातील बहुसंख्य रस्त्यांची स्थिती विदारक आहे.

...

५,४६५ खड्डे बुजविल्याचा दावा खरा की खोटा?

हॉटमिक्स विभागाने शहरातील ५,४६५ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे शहरातील सर्वच डांबरी रस्त्यावर खड्डे कायम असल्याने विभागाचा दावा खरा की खोटा, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

.....

अपघाताचा धोका वाढला

पावसामुळे खड्डे पाण्याने भरले आहेत. ते लक्षात येत नसल्याने वाहनांचा अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेने ५,४६५ खड्डे बुजविल्याचा दावा केला असला तरी, झालेल्या कामाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. काही दिवसातच बुजविलेल्या खड्ड्यातील गिट्टी बाहेर पडते. परंतु कंत्राटदाराला जाब न विचारता कोट्यवधीचे बिल दिले जाते.

...

-शहरातील एकूण रस्त्यांची लांबी २,३१३.६५ किलोमीटर

- डांबरी रस्ते १,४९१.१९ किलोमीटर

- सिमेंटचे रस्ते ७०० किलोमीटर

- कच्चे रस्ते १५० किलोमीटर