शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नगरसेवकांच्या नावावर अधिकाऱ्याची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:23 IST

नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देमनपाच्या सहायक अभियंत्यांची बदली : वरिष्ठांकडून दोषी अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक विजय चुटेले यांच्या नावावर एका कार शोरुमच्या संचालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या धंतोली झोनमधील सहायक अभियंता श्याम धरममाळी यांची सोमवारी तडकाफडकी आसीनगरला बदली करण्यात आली आहे़ मात्र, फक्त बदली करून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अतिक्रमणाच्या नावावर शहरातील दुकानदारांकडून वसुली करण्याचा सपाटाच महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे़ परंतु अतिक्र मण कारवाई होईल या धास्तीने व्यावसायिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्याने महापालिका प्रशासनाला संबंधितावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे काही अधिकारी सर्रास वसुलीच्या मागे लागले आहेत. आता तर नगरसेवकाच्या नावावर वसुली करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे़ बुधवारी १० जानेवारीला धंतोली झोनचे सहायक अभियंता श्याम धरममाळी आणि सफाई कर्मचारी संजय लुडेरकर हे दोघे ग्रेट नागरोडवरील आर्या कारच्या शोरुममध्ये गेले होते. त्यांनी नगरसेवक विजय चुटेले यांनी दोन लाख रुपयांची मागणी केल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले़ ही बाब स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक बाल्या बोरकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी चुटेले यांना यासंदर्भात विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला. थोड्याच वेळात दोघेही भाजपा कार्यकर्त्यांसह धंतोली झोन कार्यालयात दाखल झाले. झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड यांना लेखी निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली होती तसेच धरममाळी यांची जुनी प्रकरणेही निदर्शनास आणली़ याची दखल घेत व अखेर महापालिका प्रशासनाने श्याम धरममाळी यांची आसीनगर झोनमध्ये उचलबांगडी केली आहे़ मात्र कठोर कारवाई न करता बदलीची कारवाई करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची महापालिकेत चर्चा आहे.महापौरांकडे तक्रारशोरुमच्या कर्मचाऱ्यांकडे नगरसेवकांच्या नावावर पैशाची मागणी करणाऱ्याअधिकाऱ्याची महापौर नंदा जिचकार यांच्याकडे तक्रार केली आहे. अशा प्रकारामुळे महापालिका व नगरसेवकांची बदनामी होत आहे. या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विजय चुटेले यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार