शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखतीच्या निमित्ताने मनसे करणार चाचपणी

By admin | Updated: August 23, 2014 03:11 IST

विदर्भात पक्षाची विशेष ताकद नसतानाही खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी येत असल्याने त्यांच्या दौऱ्यामागचे ...

नागपूर: विदर्भात पक्षाची विशेष ताकद नसतानाही खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी येत असल्याने त्यांच्या दौऱ्यामागचे राजकीय गणित नेमके काय याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.पक्षाची शक्ती असलेल्या भागातच निवडणुकीच्या काळात अधिक लक्ष केंद्रित करण्याचे मनसेचे आजवरचे निवडणूक धोरण राहिले आहे. ते पाहता विदर्भात पक्षाची विशेष शक्ती नसताना राज ठाकरे मुलाखतीसाठी येणे हे अनाकलनीय आहे. राज यांचे प्रत्येक पाऊल हे राजकीय फायदा-तोटा लक्षात घेऊनच टाकले जाते. त्यामुळेच वरवर जरी ते मुलाखती घेण्यासाठी नागपूरमध्ये येत असले तरी यामागे त्यांचे निश्चित काही आडाखे असण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये शिवसेनेच्या वाट्याला सहापैकी फक्त एक जागा आहे तर १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही जागा नाही. मात्र या दोन्ही पक्षांकडे सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे मनसेकडे उमेदवार नाहीत. दुसरीकडे भाजप आणि मनसेची छुपी मैत्री जगजाहीर आहे. मनसेच्या माध्यमातून भाजप सेनेचा ‘गेम’ करू शकते. भाजपने यापूर्वीच नागपूरमध्ये ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा दिला आहे. इतर पक्षातील इच्छुक गळाला लागतात का याचीही चाचपणी राज घेऊ शकतात. त्यामुळे रविवारी मनसेच्या मुलाखतीला कोण जाते याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. विशेषत: सेना याबाबत अधिक दक्ष राहण्याची शक्यता आहे.दरम्यान राज ठाकरे शनिवारी रात्री मुंबईहून नागपूरला येत आहेत. त्यांच्यासोपबत आमदार बाळा नांदगावकर आणि आमदार प्रवीण दरेकर येणार आहेत. रविवारी रविभवनात ते विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेतील. (प्रतिनिधी)