शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण, फेरविचार याचिका दाखल करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आरक्षण रद्द केल्याने ओबीसींवर अन्याय झाला. या भावनेतून पक्षभेद विसरून ...

मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आरक्षण रद्द केल्याने ओबीसींवर अन्याय झाला. या भावनेतून पक्षभेद विसरून सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांनी ओबीसी एकता मंच स्थापन केला असून, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करीत या विषयावर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी केली.

राज्यात आघाडी सरकारपासून आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी मोठे प्रयत्न होत असताना २०१७ पासून महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ चे कलम १२ (२) (क) अन्वये दिलेले ओबीसी आरक्षण संरक्षित करण्याच्या बाजूने प्रयत्नच झाला नाही. परिणामी, महायुतीसह महाआघाडी सरकारच्या भूमिकेवर या निवेदनातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तीन वर्षांचा कालावधी मिळाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. आता आरक्षणच हद्दपार होत असल्याने देशातील ६० टक्के ओबीसींवर मोठा अन्याय आहे. ज्यांनी ही याचिका दाखल केली, ते प्रत्यक्ष बाधित नाहीत किंवा लाभार्थीही नाही. त्यानंतरही सरसकट ओबीसींचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे समाजात मोठा क्षोभ असून सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अन्यथा ओबीसी समाज मोठा लढा उभारेल, असा इशाराही दिला. याप्रसंगी संयोजिका अवंतिका लेकुरवाळे, संयोजक मनोहर कुंभारे, अनिल निधान, चंद्रशेखर कोल्हे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.