शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका निवड यादी रद्द

By admin | Updated: November 28, 2014 00:58 IST

महानगरपालिकेने २८ मार्च २०११ रोजी जाहीर केलेली परिचारिका व परिचारिका प्रसाविकांची निवड यादी रद्द झाली आहे. निवड यादी रद्द करण्याच्या पत्राविरुद्ध ३५ परिचारिका व परिचारिका

मनपातील प्रकरण : हायकोर्टाने नाकारला दिलासानागपूर : महानगरपालिकेने २८ मार्च २०११ रोजी जाहीर केलेली परिचारिका व परिचारिका प्रसाविकांची निवड यादी रद्द झाली आहे. निवड यादी रद्द करण्याच्या पत्राविरुद्ध ३५ परिचारिका व परिचारिका प्रसाविकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व चंद्रकांत भडंग यांनी गुरुवारी याचिका फेटाळून लावली.अतिरिक्त आरोग्य संचालकांनी केंद्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या १५ नागरी आरोग्य केंद्राना पुनर्जिवित करण्यास मान्यता दिली होती. त्यासाठी परिचारिकांच्या १६ व परिचारिका प्रसाविकांच्या ६० अशा एकूण ७६ पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी या नियुक्त्या करण्याचे अधिकार मनपाच्या जनरल बॉडीला होते. जनरल बॉडीद्वारे नियुक्त निवड समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेऊन २८ मार्च २०११ रोजी अंतिम निवड यादी जाहीर केली. यानंतर कायद्यात दुरुस्ती झाली. त्यात जनरल बॉडीचे अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले. यामुळे आयुक्तांनी शासनाला पत्र लिहून निवड यादी रद्द करण्याची सूचना केली. शासनाने कायदा दुरुस्ती निवड यादीनंतर झाल्याचे कारण देऊन ही सूचना फेटाळून लावली. यानंतर मनपाने १६ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित उमेदवारांना त्यांची निवड झाल्याचे पत्र पाठवले. त्यापुढे एक वर्षापर्यंत काहीच कारवाई झाली नाही. यामुळे आयुक्तांनी १२ मार्च २०१४ रोजी शासनाला पत्र पाठवून एक वर्षानंतर निवड यादी रद्द होत असल्याचे कळविले. परिणामी ३५ परिचारिका व परिचारिका प्रसाविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मनपा आयुक्तांचे पत्र रद्द करून निवड यादीनुसार नियुक्त्या करण्याची त्यांची विनंती होती. मनपाचे वकील अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी १९ आॅक्टोबर २०१० रोजीच्या शासन निर्णयाचा दाखला देऊन निवड यादी एक वर्षापर्यंतच गृहित धरता येत असल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विक्रम मारपकवार यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)