शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत निनादणार नागपूरचे स्वर

By admin | Updated: August 14, 2016 02:51 IST

अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन) सभागृहात येत्या १५ आॅगस्ट रोजी सांस्कृतिक..

संयुक्त राष्ट्रसंघात होणार कार्यक्रम : ए.आर. रहमानसोबत दिनेश राहाटे गाणार देशभक्तिपर गीत नागपूर : अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनायटेड नेशन) सभागृहात येत्या १५ आॅगस्ट रोजी सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नागपूरचे दिनेश राहाटे हे देशभक्तिपर गीत सादर करतील. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार ए.आर. रहमान यांच्यासोबत त्यांना येथे गाण्याची संधी मिळाली असून ते रहमान यांच्यासोबत अनेक सुफी व देशभक्तीपर गीत सादर करतील. दिवंगत संगीतकार व गायक एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. छत्रपतीनगर येथील रहिवासी दिनेश यांनी चेन्नई येथे ए.आर. रहमान यांनी स्थापन केलेल्या के.एम कॉलेज आॅफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते २००९ पासून ए.आर. रहमान यांच्याशी जुळले आहेत. यापूर्वी ते रहमान यांच्यासोबत दुबईमध्ये आयोजित तीन कार्यक्रमांमध्ये सुद्धा सहभागी झाले होते. न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध गायक जावेद अली हे सुद्धा रहमान यांच्यासोबत असतील. सुफी गीतांमध्ये आवड असल्यामुळे दिनेश ए.आर. रहमान यांच्या ग्रुपशी जुळले. मदुरै सुब्बुलक्ष्मी कर्नाटकच्या प्रसिद्ध संगीतकार व गायक होत्या. त्या सर्वात पहिल्या भारतीय होत्या, ज्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत कार्यक्रम सादर केला होता. यात ए.आर. रहमान यांचा दुसरा क्रमांक लागतो. (प्रतिनिधी) ‘अल्लाह’पर्यंत पोहोचणारा आवाज दिनेशचे भाऊ कमलेश रहाटे यांनी सांगितले की, ३२ वर्षीय दिनेश यांनी ‘रांझना’ या हिंदी चित्रपटातील एका गाण्यात आपला आवाज दिला आहे. त्यांना आता एका चांगल्या संधीची प्रतीक्षा आहे. ए.आर. रहमान यासारख्या प्रसिद्ध गीतकाराशी जुळून ते गीत सादर करीत आहे. दिनेशा आवाज रहमान यांच्या आईला खूप आवडतो. त्या नेहमी म्हणत असतात की, दिनेशचा आवाज ‘अल्लाह’पर्यंत पोहोचणारा वाटतो.