शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीत घडणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीत घडणाऱ्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या आहेत. आता यांचं कसं करावं, असा प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाला आहे.

शहरातील गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विशेष ॲक्‍शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांत अनेक मोठ्या गुंडांवर हद्दपारी, एमपीडीए,

मकोकासारखी कडक कारवाई करण्यात आली आहे. हाती आलेल्या प्रत्येक मोठ्या गुन्हेगाराचा खुद्द पोलीस आयुक्तच क्लास घेतात. त्यामुळे शहरातील कुख्यात असणाऱ्यांपैकी अनेक गुन्हेगार चांगलेच दहशतीत आले आहेत. मात्र, नव्याने गुन्हेगारीत सक्रिय झालेले आणि १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले अनेक गुन्हेगार सोकावल्यासारखे झाले आहेत. शहरातील हत्या, बलात्कार, चोरी, घरफोड्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीत अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

गेल्या तीन आठवड्यांत घडलेल्या इंदल बेलपारधी, रोशन कुंभारे तसेच अंकित बोकडे या तिघांच्या हत्याकांडात अल्पवयीन आरोपींचा सहभाग उघड झाला आहे. एवढेच नव्हे तर बलात्काराच्या प्रकरणात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या मोठी आहे. गेल्या आठवड्यात एका १६ वर्षांच्या आरोपीने उत्तर नागपुरातील १५ मुलीला गर्भवती बनविले. एमआयडीसीतील १६ वर्षांच्या मुलीसोबत १७ वर्षांच्या आरोपीने दोन वर्षांपासून ५० पेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध जोडले. विविध पोलीस ठाण्यात उघडकीस आलेल्या वाहन चोरीच्या घटनांतही अल्पवयीन आरोपींचा सहभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. सराईत गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस कठोर उपाय योजना करतात. मात्र, अल्पवयीन असलेल्या गुन्हेगारांवर पोलिसांना कठोर कारवाई करता येत नाही. काही दिवसांसाठी त्यांना सुधारगृहात पाठविले जाते. तिकडून परत येताच ते सराईत बनतात आणि गुन्हेगारीत नव्या दमाने सक्रिय होतात. या एकूणच प्रकारामुळे पोलिसांसमोर नवीनच आव्हान उभे ठाकले आहे.

---

नशेच्या गोळ्यांचा वापर

मोठेच नव्हे तर अल्पवयीन गुन्हेगारही गुन्हा करण्यापूर्वी नशेच्या गोळ्यांचा वापर करतात. प्रतिबंध असूनही अनेक मेडिकल स्टोअर्सचे संचालक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जास्त पैसे घेऊन या नशेच्या गोळ्या देतात. ज्या घेतल्यानंतर गुन्हेगार काय करतो, याचे त्याला भान उरत नाही.

---