शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

फसवणुकीचा आकडा २० कोटींवर

By admin | Updated: August 11, 2014 00:48 IST

दुप्पट किमतीत शेती विकून देतो या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या २० च्या घरात असून तब्बल २० कोटी रुपयांनी मंगेश रामकृष्ण साठे रा. सावध या ठकबाजाने लोकांची फसवणूक

आरोपी फरारच : शेती खरेदी-विक्रीचे प्रकरण आकोली (वर्धा) : दुप्पट किमतीत शेती विकून देतो या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या २० च्या घरात असून तब्बल २० कोटी रुपयांनी मंगेश रामकृष्ण साठे रा. सावध या ठकबाजाने लोकांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. एवढेच नव्हे तर दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचेसुद्धा सहा लाख रुपये बुडविले आहेत. साठे याने पत्नी, भाऊ, आईच्या नावे शेती खरेदी केली तर झोपडीत राहणाऱ्या १० ते १२ लोकांच्या नावे लाखोंचे सोने बँकेत तारण म्हणून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ठगबाज मंगेश साठे याने मुंबईच्या एका कंपनीकरिता आपण शेती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे अनेकांना सांगितले होते. त्याच्या सांगण्यानुसार व तक्रारकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीतील कागदावरून पोलिसांनी मुंबई येथील विक्रमसिंग सूर्यवंशी यांच्याशी सपंर्क साधला असता त्यांना या व्यवहाराची कुठलीही माहिती नसल्याचे समोर आले. वर्धा येथील राजकुमार कन्हैयालाल कलवानी यांना शेती विकून दुप्पट रक्कम करून देतो, असे आमिष देत मंगेश साठे याने ३५ लाखांनी फसविले. खरांगणाचे ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनात बँक खाते तपासणे, पैसा कुठे गुंतवला, स्थावर मालमत्ता कुठे व कुणा-कुणाचे नावे खरेदी केली या बाबी तपासण्यात आल्या.साठे याने बँक आॅफ इंडियाच्या खरांगणा शाखेतून सोने तारण योजनेत आठ लाख रुपये उचलले आहे. या बदल्यात त्याने झोपडीत राहणाऱ्या गरीब विश्वासू अशा १० ते १२ लोकांच्या नावांवर सोने गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या नावे १.७० हेक्टर आर., आईच्या नावे १.६५ हेक्टर आर. व भावाचे नावे १.२१ हेक्टर आर. शेती विकत घेतली.गौरव भास्कर पोलशेट्टीवार रा. राजुरा यांना किसना दौलत दुर्गे रा. आंजी यांनी ४५ लाख रुपयांत शेती विकली. सदर शेत सर्व्हे नं. ९० चे बनावट कागदपत्र तयार करून विक्रमसिंग सूर्यवंशी रा. मुंबई यांना ती जमीन ५६ लाख रुपयांत विकल्याचे दाखवले. परत तीच शेती विक्रमसिंह यांनी पुष्पा सुनील झाटे रा.सेलू जि. परभणी यांना चार लाखांत विकल्याचा पुरावा आहे. ५६ लाखांत विकत घेतलेली शेती चार लाखात विकणे अशक्यच आहे. यासाठी खरांगणा पोलीस पुष्पा झाटे यांच्याशी संपर्क साधणार आहेत. (वार्ताहर)