शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा विभागावर आता कुलगुरूंचा ‘कंट्रोल’

By admin | Updated: March 20, 2017 02:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे.

परीक्षा संचालकांकडून प्र-कुलगुरूंकडे फायली जाणार नाहीत : परीक्षा विभागाचे काय होणार? योगेश पांडे   नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्याचे श्रेय प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांना देण्यात येत आहे. मात्र डॉ. येवले यांचा परीक्षा विभागावरील ‘कंट्रोल’ कुलगुरूंच्या हाती येणार आहे. परीक्षा व मूल्यमापन संचालकांना विविध फायली प्र-कुलगुरूंना न पाठवता थेट कुलगुरुंना पाठवाव्या लागणार आहेत. कुलगुरूंच्या आदेशानुसार कुलसचिवांनी यासंदर्भात परिपत्रकच जारी केले आहे. डॉ. येवले परीक्षेच्या कामापासून दूर झाले तर परीक्षा व मूल्यमापन विभागाचे काय होणार, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंवर संपूर्ण विद्यापीठाचीच जबाबदारी असते व त्यांची कार्यकक्षा व्यापक असते. कामाचा भार लक्षात घेता. जुन्या विद्यापीठ कायदा अस्तित्वात असेपर्यंत नागपूर विद्यापीठात परीक्षेचा भार हा प्र-कुलगुरूंवरच होता. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर प्र-कुलगुरूंच्या कार्यकक्षेतदेखील बदल झाला आहे. जारी झालेल्या परिपत्रकानुसार प्र-कुलगुरूंकडे ‘बीसीयूडी’ची मोठी जबाबदारी राहणार आहे. नवीन कायद्यात ‘बीसीयूडी’ संचालकांचे पदच नाही. या पदाची बहुतांश कर्तव्ये व अधिकार प्र-कुलगुरूंना प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत परीक्षा विभागातून प्र-कुलगुरूंकडे फायली यायच्या. यामुळे अनेक गैरप्रकारदेखील कमी झाले होते. मात्र यापुढे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांना परीक्षा व मूल्यमापन विभागातील सर्व फायली थेट कुलगुरूंच्या अंतिम मान्यतेसाठी सादर कराव्या लागणार आहेत. यामुळे प्र-कुलगुरुंऐवजी थेट कुलगुरुंचाच परीक्षा विभागावर ‘कंट्रोल’ राहणार आहे. नियमानुसार जबाबदारीचे वाटप यासंदर्भात कुलसचिव पूरण मेश्राम यांच्याशी संपर्क केला असता नव्या विद्यापीठ कायद्यातील नियमांनुसार अधिकाऱ्यांच्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्र-कुलगुरूंकडे परीक्षा विभागाचे काम होते. मात्र आता त्यांच्याकडे ‘बीसीयूडी’चे ९५ टक्के काम आले आहे. शिवाय ‘बीसीयूडी’, महाविद्यालयीन शाखा व विकास शाखा यांचा मिळून ‘महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग’ तयार झाला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी प्र-कुलगुरूंकडे राहणार आहे. परीक्षा विभागातील ज्या समित्यांवर प्र-कुलगुरुंचा सहभाग आहे, त्याचे काम ते निश्चित बघतील. शिवाय कुलगुरूदेखील आवश्यकतेनुसार प्र-कुलगुरूंचा सल्ला घेऊ शकतील, असे मेश्राम यांनी सांगितले. परीक्षा विभागाला फटका बसणार ? विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गाडी रुळावर आणण्यात प्र-कुलगुरूंचा मौलिक वाटा असल्याचे कुलगुरूंनीदेखील अनेकदा म्हटले आहे. त्यांच्याच पुढाकारामुळे परीक्षा विभागाचे अत्याधुनिकीकरण होत असून निकालांचा वेगदेखील वाढला. शिवाय ‘पीएचडी’च्या बजबजपुरीलादेखील त्यांनी कात्री लावत दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. परीक्षा विभागातील दैनंदिन कारभारावर त्यांचे लक्ष होते. बहुतांश फायली त्यांच्याच नजरेखालून पुढे आवश्यकतेनुसार कुलगुरूंकडे जात होत्या. अशा स्थितीत ते परीक्षेच्या कामापासून दूर झाल्यास परीक्षा विभागाचा वेग मंदावेल की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान नव्या विद्यापीठ कायद्यातील कलम १३ अनुसार प्र-कुलगुरूंकडेची कार्यकक्षा संपूर्ण विद्यापीठ असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. इतर काही कलमांनुसारदेखील परीक्षा विभागाशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.