शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आता ‘कोविशिल्ड’ची मानवी चाचणीही नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 08:36 IST

‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्दे मेडिकलला मिळाली परवानगी ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची ही लस १०० व्यक्तींना दिली जाणार

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात १०० व्यक्तींवर ही चाचणी के ली जाणार असून पुढील आठवड्यापासून याच्या रीतसर नोंदणीला सुरुवात होणार आहे.भारतात तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरू झाला असताना आता ‘कोविशिल्ड’ चाचणीला सुरुवात होणार असल्याने नागपूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोरोनाविरोधातील लसनिर्मिती निर्णायक टप्प्यावर आहे. विशेषत: ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. याची चाचणी १७ केंद्रामधील १६०० नागरिकांवर २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० नागरिकांवर कोरोना लसची चाचणी घेण्यात येत आहे. आता यात नागपूरचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही (मेडिकल) जुळले आहे.

सुरक्षितता व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासणारमेडिकलच्या पल्मनरी मेडिसीनचे विभाग प्रमुख, कोविड हॉस्पिटल आयसीयूचे इन्चार्ज व ‘कोविशिल्ड’ चाचणीचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुशांत मेश्राम यांनी ‘लोकमत’ला सांगितले, ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’शी करार करून सीरम इन्स्टिट्यूटतर्फे या लसीची निर्मीती केली जाणार आहे. ‘आयसीएमआर’च्या निगराणी खाली नागपूर मेडिकलला लसीची मानवी चाचणी होणार आहे. दिल्ली एम्ससह राज्यात पुणे, मुंबई येथे चाचणी सुरू आहे. ‘फेज टू बाय थ्री’मध्ये मेडिकलमध्ये होणाऱ्या या चाचणीत लसीची सुरक्षितता व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याची क्षमता तपासली जाणार आहे. या चाचणीतसह अन्वेषक म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. शिल्पा गुप्ता, डॉ. सुशांत मुळे, डॉ. रवी यादव, व डॉ. अलिना अलेक्झांडर आदींचा समावेश आहे. मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांचेही यात सहकार्य मिळाले आहे.

२८व्या दिवशी दुसरा डोज ‘कोविशिल्ड’ मानवी चाचणीत १८ ते ६० वयोगटातील निरोगी व्यक्तीची निवड केली जाणार आहे. सुरूवातीला १०० व्यक्तींवर ही चाचणी होणार आहे. पहिला डोज दिल्यानंतर २८ व्या दिवशी दुसरा डोज दिला जाणार आहे. त्यानंतर ५६ व्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी होईल, ९० व्या दिवशी त्यांची फोनवरून चौकशी केली जाईल आणि १८० व्या दिवशी त्यांची पुन्हा हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाईल. या दरम्यान त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत लागली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे.-डॉ. सुशांत मेश्राम प्रमुख अन्वेषक,कोविशिल्ड चाचणी -मेडिकलसाठी गौरवाची बाब ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अ‍ॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन तयार के लेल्या लसीची मानवी चाचणीसाठी मेडिकलला परवानगी मिळणे ही गौरवाची बाब आहे. मेडिकलमध्ये ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’अंतर्गत प्लाझ्मा थेरपी व इतरही महत्त्वाच्या औषधांच्या चाचण्या सुरू आहेत. याचा फायदा नक्कीच रुग्णाला होणार आहे.-डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या