शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आता आधार लिंकसाठी घेणार विद्यार्थ्यांची मदत

By admin | Updated: June 26, 2015 02:46 IST

‘आधार कार्ड’ निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याच्या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने ...

नागपूर : ‘आधार कार्ड’ निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याच्या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने निवडणूक विभागाने आता यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रायोगिक स्तरावरील सुरुवात २६ जूनपासून होत आहे. आधार कार्ड निवडणुकीच्या कार्डाशी जोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशेष शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात आली होती. परंतु या अभियानाला पाहिजे तसा प्रतिसाद लोकांकडून मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने आता यासाठी विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ३७० कॉलेज आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये शिबिर घेऊन त्यातून दोन विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून निवड करण्यात येईल. त्याला प्रशिक्षित केले जाईल. त्यानंतर ते विद्यार्थी स्वयंसेवक लोकांमध्ये जाऊन आपल्या परिसरातील नागरिकांना आधार कार्ड निवडणूक कार्डशी लिंक करण्याबाबत जागृती करतील, असे एकूण याचे स्वरूप आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यातील १२ महाविद्यालयातून याची शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. शहरातील धनवटे नॅशनल कॉलेज, सीपी अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय, पीडब्ल्यूएस कॉलेज, तुली इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट, काटोल येथील नबीरा महाविद्यालय, सावनेर येथील हरिभाऊ आदमने आर्ट अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय, हिंगणा येथील वायसीसीए, उमरेड येथील नूतन आदर्श अ‍ॅण्ड कॉमर्स महाविद्यालय आदी महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळात शिबिर आयोजित करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना या अभियानाबाबत माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर इतर महाविद्यालयात हाच प्रयोग राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)