शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

आता ‘वॉट्स अ‍ॅप’वरही तक्रारींची दखल

By admin | Updated: May 2, 2015 02:22 IST

कडक उन्हाळ्यात दूध, शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त कुलिंग चार्जेस घेणाऱ्या दुकानदारांची तक्रार

नागपूर : कडक उन्हाळ्यात दूध, शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्यासाठी अतिरिक्त कुलिंग चार्जेस घेणाऱ्या दुकानदारांची तक्रार ‘वॉट्स अ‍ॅप’वर करण्याचे आवाहन वैधमापन विभागाचे नागपूर विभागीय उपनियंत्रक (प्रभारी) ललित हारोडे यांनी लोकमतशी बोलताना केले. तक्रारीसाठी विभागाने ९८६९६९१६६६ हा वॉट्स अ‍ॅप क्रमांक जारी केला आहे.ग्राहकांना कुलिंग चार्ज घेणाऱ्या दुकानदाराची तक्रार ‘वॉट्स अ‍ॅप’वर करायची आहे. तक्रारीत ग्राहकाचे नाव, दुकानदाराचे नाव, शहराचे नाव, परिसर, उत्पादनाची माहिती द्यायची आहे. ग्राहकाच्या तक्रारीची नोंद थेट मुंबई येथील मुख्य नियंत्रक कार्यालयात होणार आहे. मुख्य कार्यालयातून आलेल्या निर्देशानुसार विभागीय स्तरावर, जिल्हानिहाय अधिकारी संबंधित दुकानाची तपासणी करतील आणि कारवाई करून दंड आकारतील. या कारवाईची माहिती विभागीय अधिकारी मुख्य कार्यालयाला देतील. यासाठी ग्राहकांना पुढे येण्याची गरज आहे. कूलिंग चार्ज देऊ नका, घेतल्यास बिल मागा, हारोडे म्हणाले. एप्रिल महिन्यात जवळपास ७ ग्राहकांनी वॉट्स अ‍ॅपद्वारे विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर विभागाने कारवाई करून दंडही आकारला. दुकानदारांकडून उत्पादनाच्या छापील किमतीवर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क वसूल करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी विभागाने वॉट्स अ‍ॅपद्वारे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. छापील किमतीपेक्षा जास्त शुल्क आकारणाऱ्या दुकानदारावर फौजदारी कारवाईऐवजी सध्या २ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी अशा गुन्ह्यात दंडासह फौजदारी कारवाईचे सूतोवाच केले आहे. (प्रतिनिधी)