शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी सावधान, वाघ बिबट्यांचा घातपातच अधिक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:09 IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात आणि प्रकल्पांमध्ये मागील ७ वर्षात ३० वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेक ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात आणि प्रकल्पांमध्ये मागील ७ वर्षात ३० वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यातील बहुतेक वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने झाल्याची नोंद आहे. असे असतानाही पेंच प्रकल्पामध्ये आजही शिकाऱ्यांकडून विजेचे सापळे लावले जात आहेत. यामुळे या वन्य जीवांना वाचविण्यासाठी वन विभाग किती दक्षतेने काम करीत असावा, असा संशयाला वाव असणारा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेंच प्रकल्पामधील नागलवाडी रेंज फॉरेस्टमध्ये गेल्या महिन्यात १७ नोव्हेंबरला घडलेली घटना या पार्श्वभूमीवर बोलकी ठरावी, अशी आहे. जिप्सीमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे वाहन थेट शिकारी टोळ्यांनी बसविलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आले होते. प्रसंग थोडक्यात टळल्याने पर्यटक बचावले. विशेष म्हणजे, पर्यटकांचा वावर असणाऱ्या वनक्षेत्रातच असा प्रकार घडल्याने शिकाऱ्यांचे मनोधर्य किती वाढले असावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात मागील काळात झालेल्या वाघ-बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीकडे लक्ष वेधणेही महत्त्वाचे ठरले आहे. २०१३ ते नोव्हेंबर २०२० या काळात मागील ७ वर्षात ९ वाघांचा आणि २१ बिबट्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी फक्त तीन वाघ आणि चार बिबट्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. मात्र उर्वारीत २३ वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने झाल्याची नोंद आहे. फक्त सात वर्षात एकाच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ-बिबट्यांचा मृत्यू घातपात आणि अपघाताने व्हावा, हे गंभीर मानले जात आहे.दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी मुख्य वनसंरक्षक व पेंच व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्ररक्षक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी दोन सदस्यांची स्वतंत्र समिती गठित केली होती. मागील तीन वर्षांत नागलवाडी व परिसरात घडलेल्या घटना तसेच वनविभाग आणि महावितरणने केलेल्या कारवाईचा आढावा घेऊन १ डिसेंबरला ही समिती अहवाल देणार होती. हा अहवाल काय आला या संदर्भात गोवेकर यांच्याशी संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

अशी आहे मृत्यूची आकडेवारी

वर्ष वाघ कारण बिबट कारण

२०१३ ४ घातपात १ घातपात

२०१४ - - ४ घातपात, अपघात

२०१५ १ नैसर्गिक ३ अपघात, नैसर्गिक

२०१६ १ नैसर्गिक ३ नैसर्गिक

२०१७ २ घातपात २ नैसर्गिक, अपघात

२०१८ - - ४ घातपात, अपघात

२०१९ १ नैसर्गिक ३ नैसर्गिक, अपघात, घातपात

२०२० - - १ घातपात

एकूण ९ - २१ -

...