शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता कोळशावर ६ टक्के जीएसटी

By admin | Updated: July 9, 2017 01:54 IST

जीएसटीमुळे कोळशाचे दर १२ वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. त्याचा फायदा कोळशावर चालणारे उद्योग

विजेचे दर कमी व्हावे : कर कपातीचा फायदा ग्राहकांना द्यावा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीएसटीमुळे कोळशाचे दर १२ वरून ६ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. त्याचा फायदा कोळशावर चालणारे उद्योग आणि वीज उत्पादन कंपन्यांना होणार आहे. वस्तूंच्या उतरत्या किमतीचा फायदा ग्राहकांना व्हावा आणि महावितरणने विजेचे दर कमी करावे, अशी ग्राहकांची मागणी आहे. सिमेंटचे भाव उतरले याशिवाय जीएसटीमुळे वाहन आणि औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत. पण कापड, लाल मिरची, हळद, साखर, सुंठ आदींवर ५ टक्के जीएसटी वसूल करण्यात येणार आहे. पूर्वी राज्यात उपरोक्त वस्तूंवर व्हॅट नव्हता. राज्यात सिमेंटचे भावही कमी झाले आहेत. तसे पाहता पूर्वीच्या ३१ टक्क्यांच्या तुलनेत सिमेंटवर २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी कमी झाला आहे. तसेच जीएसटीमध्ये कच्च्या मालाचे दर कमी झाल्यामुळे सिमेंट कंपन्यांनी भाव कमी केले आहेत. अल्ट्राटेक कंपनीने सिमेंटचे भाव ३२८ वरून ३०६ रुपये आणि गुुजरात अंबुजा सिमेंटचे भाव ३३३ रुपयांवरून ३०७ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्याचा फायदा बांधकाम कंपन्या आणि नागरिकांना होणार आहे. कंत्राटदारांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी सिमेंट बोरीचे भाव २८० रुपये होते. पण उठाव ७० ते ९० टक्के कमी असल्यामुळे कंपन्यांनी एकत्रितरीत्या भाव प्रति बोरी ५० रुपयांनी वाढविले होते. त्यावेळी सिमेंटचे भाव ३३० रुपयांपर्यंत पोहोचले होते. जीएसटी लागू झाल्यामुळे सिमेंटच्या भावात कंपन्यांनी जवळपास २५ रुपयांची कपात केली. अनेक दिवसांपासून लोखंडाचे भाव स्थिर असून बाजारपेठेत ३८ रुपये किलो भाव आहेत. जीएसटीमध्ये जवळपास ५० हजार व्यावसायिकांची नोंदणी राज्य वस्तू व सेवा कर नागपूर विभागीय सहआयुक्त (प्रशासन) पूनमचंद अग्रवाल यांनी सांगितले की, नागपूर विभागात जवळपास ५० हजार व्यावसायिकांनी जीएसटीमध्ये नोंदणी (मायग्रेशन) केली आहे. वार्षिक २० लाखांपेक्षा कमी व्यवसाय असलेल्यांना नोंदणी करायची नसल्यामुळे पूर्वीच्या ५५ हजारांच्या तुलनेत नोंदणीचा आकडा कमी झाला आहे. कापडासह लाल मिरची, हळद व साखर आदी वस्तू जीएसटीच्या टप्प्यात आल्या आहेत. त्या व्यावसायिकांना नव्याने नोंदणी करावी लागेल. त्यामुळे नोंदणीचा आकडा ६० हजारांपर्यंत जाईल. नवीन सिस्टीममध्ये नोंदणीचे केंद्र आणि राज्य असे पर्याय आहेत. बहुतांश व्यावसायिकांचा कल राज्याकडे आहे. तीन महिने विभागातर्फे नोंदणी आणि सर्वेक्षण होणार नाही, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. गेल्यावर्षी राज्यात ९० हजार कोटी रुपयांचे व्हॅट कलेक्शन झाले. यावर्षी १.१० लाख कोटींचे उद्दिष्ट आहे. नागपूर विभागात गेल्यावर्षी जवळपास ४३०० कोटींचे कलेक्शन झाले. ते उद्दिष्टांपेक्षा २०० कोटी कमी झाले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात नागपूर विभागाला ५ हजार कोटी जीएसटी वसुलीचे उद्दिष्ट असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.