शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डासाठी अधिसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 12:04 IST

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करण्यासाठी २९ जुलैला अधिसूचना काढली आहे.

ठळक मुद्देकिरकोळ व्यापाऱ्यांना फायदा बोर्डाने व्यापारी संघटनांशी संवाद साधावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्ड स्थापन करण्यासाठी २९ जुलैला अधिसूचना काढली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या घोषणेचे कन्फेडरेशन आॅफ इंडिया ट्रेडर्सने (कॅट) स्वागत करताना शासनाचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले आहे. बोर्डाच्या माध्यमातून देशातील सात कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, अधिसूचनेनुसार बोर्ड व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना व व्यापाऱ्यांना लागू होणारे अधिनियम आणि नियमांच्या सुलभीकरणासाठी सूचना देणार आहे. तसेच व्यापाऱ्यांना लाभ मिळवून देणाऱ्या योजनांची आणि व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी विमा, पेन्शन, आरोग्य सेवा जसे सामाजिक सुरक्षेसंदर्भात बोर्ड शिफारस करणार आहे.बोर्डाचे अध्यक्ष बिगर शासकीय, पाच बिगर शासकीय सदस्य आणि व्यापारी संघटनांचे १० प्रतिनिधी राहणार आहे. आठ मंत्रालय आणि नीती आयोगाच्या प्रतिनिधींना बैठकीत आमंत्रित करण्यात येणार आहे. बोर्डाची प्रत्येक तिमाहीत किमान एकदा बैठक होणार आहे.वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत विभागाद्वारे बोर्डाला सचिवालयातर्फे मदत देण्यात येईल. नवी दिल्ली येथे १९ एप्रिल २०१९ ला झालेल्या कॅटच्या व्यापारी रॅलीत मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा केली होती, हे विशेष. त्यानुसार पंतप्रधानांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोत्तम पाऊल उचलल्याचे भरतीया यांनी सांगितले. देशातील सात कोटींपेक्षा जास्त किरकोळ व्यापाऱ्यांचे कल्याण, कर आधारित व्यापार बनविणे आणि सर्वोत्तम व्यवसाय प्रथांचा अवलंब करण्यासाठी बोर्ड रचनात्मक प्रयत्न करणार आहे. देशातील व्यापारी संघटनांशी थेट संवाद साधून, त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा बोर्डाचा प्रयत्न राहणार आहे. भरतीया म्हणाले, स्थापनेनंतर बोर्डाने देशातील व्यावसायिक समूहाचे एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण करावे. एका सर्वेक्षणानुसार सध्या देशात दरवर्षी किरकोळ व्यवसाय जवळपास ४५ लाख कोटींचा असून, बिगर कॉर्पोरेट क्षेत्राच्या जीडीपीमध्ये ४५ टक्के योगदान आहे.या तुलनेत कॉर्पोरेट क्षेत्राचे केवळ १५ टक्के योगदान आहे. त्यामुळे देशात किरकोळ व्यापारी क्षेत्राचे सक्षमीकरण आणि वाढविण्याची गरज आहे. बोर्डाने घरगुती व्यवसाय सुव्यवस्थित करण्यासाठी काम करावे आणि किरकोळ व्यावसायिक क्षेत्राच्या वाढीसाठी व्यावसायिक समूदायाची क्षमता वाढवावी. याशिवाय महिला उद्योजिकांना प्रोत्साहन आणि व्यापाऱ्यांतर्फे अन्य देशांमध्ये निर्यात वाढीवर बोर्डाने भर द्यावा.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार