शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

हा यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नाही

By admin | Updated: March 13, 2017 02:22 IST

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे शब्द म्हणजे यशवंतरावांचे यथार्थ वर्णन आहे. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत,

मधुकर भावे : यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान नागपूर : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे शब्द म्हणजे यशवंतरावांचे यथार्थ वर्णन आहे. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे केले. परंतु आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय तो यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र नक्कीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत मधुकर भावे यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त रविवारी धनवटे सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वि.स. जोग, विशेष अतिथी डॉ. सतीश चतुर्वेदी आणि डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. आजच्या प्रगत महाराष्ट्रात यशवंतरावांची कशी उपेक्षा होतेय हे सांगताना भावे म्हणाले, या नेत्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी पूर्ण राज्यात केवळ दोनच कार्यक्रम झाले. एक त्यांच्या समाधीस्थळी कराडला आणि दुसरा नागपुरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात. आपल्या राज्यातील जायकवाडीसारखे मोठे धरण असेल वा कोराडीचा ऊर्जा प्रकल्प असेल. असे मोठे प्रकल्प १९८० नंतर कुणी उभारू शकले नाही. आज राजकारणात सात्विकता उरली नाही. नुसता स्वार्थाचा बाजार आहे. यशवंतरावांवर भूमिका बदलल्याची टीका होत असेल पण त्यांनी कधीच राष्ट्रहिताशी तडजोड केली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या कार्यक्रमाला डॉ. प्रमोद मुनघाटे, अजय पाटील, डॉ.कोमल ठाकरे, प्रेम लुनावत, रमेश बोरकुटे, मोहम्मद सलीम हेही उपस्थित होते.(प्रतिनिधी)