शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

() नागपूर : अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयाच्या तीन दिवस चकरा मारुनही समितीने वैधता प्रमाणपत्र न दिल्याने ...

()

नागपूर : अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र समितीच्या कार्यालयाच्या तीन दिवस चकरा मारुनही समितीने वैधता प्रमाणपत्र न दिल्याने गोवारी समाजातील एका हुशार विद्यार्थिनीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न भंगले. विशेष म्हणजे तिने १६ ऑगस्ट २०१९ मध्ये समितीच्या अमरावती कार्यालयाकडे अर्ज केला होता. ऐन प्रवेशाच्या वेळेपर्यंत तिला प्रमाणपत्र नाकारलेही नाही आणि दिलेही नाही. समाजाचे असे अनेक विद्यार्थी आहे जे वैधता प्रमाणपत्राअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहे.

या पीडित विद्यार्थिनीचे नाव स्वाती साहेबराव सोनोने आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सोनोळा गावातील ती रहिवासी आहे. वडील शेतमजुरी करीत असताना स्वातीने दहावीत ९७ टक्के, बारावीत ८५ टक्के गुण मिळविले. वैद्यकीय प्रवेश पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिचा एमबीबीएससाठी श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे येथे नंबर लागला होता. प्रवेशासाठीची सर्व तयारी तिची झाली होती. फक्त अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तिला मिळाले नव्हते. अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती अमरावती यांच्याकडे तिने ऑगस्ट २०१९ मध्ये अर्जही केला होता. गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने कार्यालयाच्या चकरा तिने मारल्या. पण वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही त्यामुळे कॉलेजने तिचा प्रवेश नाकारला.

- व्हॅलिडीटीसाठी २०१९ मध्ये अर्ज केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. पण समितीच्या अधिकाऱ्यांनी वेळेपर्यत निर्णय घेतला नाही. अखेर महाविद्यालयाने प्रवेश नाकारला.

स्वाती सोनोने, पीडित विद्यार्थिनी

- अनेक विद्यार्थी व्हॅलिडीटीच्या प्रतीक्षेत

१४ ऑगस्ट २०१८ मध्ये उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारींना अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याचे आदेश दिले. २५ जानेवारी २०१९ मध्ये नागपूर खंडपीठाने गोवारी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ देण्याचे आदेश दिले. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी आदिवासी विभागाने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे सर्व विभागांना व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यामुळे गेल्यावर्षी इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातून गोवारी समाजाचे ९ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरले. पण २०२० पासून नागपूर आणि अमरावती समितीच्या सहआयुक्त विद्यार्थ्यांच्या व्हॅलिडीटीवर निर्णयच घेत नसल्याने अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहे.

- आदिवासी आयुक्त तसेच समितीचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी दोन्ही समितींना वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश निर्गमित केले. पण दोन्ही समितीचे सहा. आयुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दडपशाहीचे धोरण राबवित आहे. नाकारतही नाही आणि देतही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन