शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए

By admin | Updated: May 9, 2016 03:00 IST

खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही,

नागपूर : खासगी डॉक्टरांची सर्वात मोठी संघटना असलेली इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ‘ज्याचे कुणी नाही, त्याचे आयएमए’ या संकल्पनेला घेऊन आता वाटचाल करणार आहे. शासकीय डॉक्टर जेथे पोहोचत नाहीत, तेथे ‘आयएमए’ने जाण्याची तयारी दर्शवली आहे. नैतिकता आणि पारदर्शकपणाने रुग्णांना सुरक्षित व उत्कृष्ट दर्जाची आरोग्यसेवा देणे हेच आमचे ध्येय आहे, असा विश्वास ‘आयएमए’चे राष्ट्रीय महासचिव पद्मश्री डॉ. के. के. अग्रवाल यांनी व्यक्त केला. ‘आयएमए’ नागपूर शाखेचा पदग्रहण सोहळा रविवारी सायंकाळी थाटात पार पडला. या सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. अजय काटे यांनी डॉ. अविनाश वासे यांच्याकडे अध्यक्षपदाची तर मावळते सचिव डॉ. सरिता उगेमुगे यांनी डॉ. अर्चना कोठारी यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवली.दरम्यान डॉ. अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ते म्हणाले, ‘आयएमए’चे देशात दोन लाख सहा हजार सदस्य आहेत. रुग्णाची काळजी घेणे प्रत्येक डॉक्टरांचे कर्तव्य आहे. नवीन डॉक्टरला पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आता आयएमएने पुढाकार घेतला आहे. गरीब रुग्णांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. (प्रतिनिधी)शासन काही निर्णय चुकीचे घेत आहेडॉ. अग्रवाल म्हणाले, डॉक्टरांजवळ जायचेच कशाला? आपण व्यायाम केल्यास, दररोज दोन कि.मी.पर्यंत चालल्यास, दोन मजली पायऱ्या चढल्यास तसेही आरोग्य सुदृढच राहील. प्रत्येकाने आनंदी व सुदृढ राहावे, असे ‘आयएमए’चे सांगणे आहे. प्रत्येक शहरात, देशात व जगात प्रत्येक आजारावर उपचार आहे. ‘आयएमए’ सरकारसोबत काम करण्यास तयार आहे. परंतु, शासन काही निर्णय चुकीचे घेत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉक्टरांची नव्हे, ‘हेल्दी’ वस्तूंची मागणी कराडॉक्टरांच्या संख्येला घेऊन नेहमीच ओरड होत असते. डॉक्टरांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी करण्यापेक्षा स्वत: निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. शासनाकडे व्यायाम करण्यासाठी उद्याने मागा, सायकली मागा, सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या वस्तूंचा पुरवठा करण्याची मागणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सोयी न देता खेडेगावात कसा जाणार डॉक्टर दिल्लीमध्ये परिचारिकेचे वेतन ६० हजार रुपयांपासून सुरू होते. परंतु ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना केवळ २५ ते ३० हजार मिळतात. यातच शासन सोयीही उपलब्ध करून देत नाही. यामुळे डॉक्टर खेड्यापाड्यात आपली सेवा देण्यास टाळाटाळ करतात. शासनाने यावर विचार करून प्रभावी उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे.